LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

डोंबिवली पोलीसांकडून सुझुकी ऍक्सेस स्कुटी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून ७०,०००/- रुपये किमतीची स्कुटी हस्तगत..

 

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  दिनांक २३/०२/२०२३ रोजी ११.३० ते १२.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी देवराज मेघजी बारवाडी (वय: ४४ वर्षे) धंदा:- फुटवेअर व्यवसाय डोबिवली पश्चिम हे त्यांचे सारस्वत बँक डोंबिवली पूर्व येथे बँकेत काम असल्याने त्यांची मोटार सायकल स्कुटी सुझुकी ऍक्सेस - एमएच०४ केके ५२७६ ही पीपी चेंबर जवळ असलेल्या सारस्वत बँकेच्या मेन गेटच्या समोर 'सिल्वर कॉईन बिल्डींग' येथे स्कुटी पार्क करुन बँकेत कामानिमीत्त गेले असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची ७०,००० रुपये किंमतीची स्कुटी ही चोरी केली म्हणुन फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून डोंबिवली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि क्र.७२/२०२३ कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.


नमुद गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सपोनि योगेश सानप, पोहवा. विशाल वाघ, भणगे, लोखंडे, पोअं. राठोड, गवळी यांनी तपासादरम्यान चोरीस गेलेली सुझुकी ऍक्सेस स्कुटी ज्या ठिकाणीवरून चोरीस गेली त्या परीसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून त्याचा मागोवा घेत सदर आरोपीस राहत असलेल्या परीसर तुकाराम रसाळ चाळ, लोढा, डोबिवली पूर्व या ठिकाणी पाळत ठेवून सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्यास अटक करण्यात आली व  त्याच्याकडून नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल स्कूटी सुझुकी ऍक्सेस एमएच ०४ केके ५२७६ ही हस्तगत करण्यात आली. 


सदरची कामगिरी मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३,कल्याण चे सचिन गुंजाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि (गुन्हे) तडवी, यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा. विशाल वाघ, सचिन भालेराव, भणगे, लोखंडे, पोअं. राठोड, गवळी, पोना. कोती यांनी कामगीरी पार पाडली.

जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...