BREAKING NEWS
latest

१००% निकालाचा विक्रम! जोगेश्वरीतील ‘बालविकास’ आणि ‘आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल’च्या गुणवंतांचा झळाळता नावलौकिक!


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

जोगेश्वरी पूर्व : शिक्षण क्षेत्रात एक नवीन सोनेरी अध्याय! रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज मुंबई संचलित ‘बालविकास विद्या मंदिर’ आणि ‘आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल’ या दोन्ही शाळांनी यंदाच्या शालांत परीक्षेत १००% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नवा उच्चांक गाठला आहे!

बालविकास विद्या मंदिर
  • प्रथम क्रमांक: कुमारी अश्मि महेश सावंत – ९७.६०%
  • द्वितीय क्रमांक: कुमारी निधी सावंत – ९६%
  • तृतीय क्रमांक: कुमारी श्रेया संतोष सुतार – ९५%
आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल
  • प्रथम क्रमांक: कुमार प्रसाद प्रकाश नारकर – ९६.६०%
  • द्वितीय क्रमांक: कुमारी श्रावणी कदम – ९३%
  • तृतीय क्रमांक: कुमारी वैष्णवी धोबी – ९२.८०%
या गौरवाच्या क्षणी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, व पालकांचे विशेष योगदान उल्लेखनीय ठरले. संस्थेचे कार्याध्यक्ष सहदेव सावंत, उपकार्याध्यक्ष अशोक परब, सरचिटणीस जितेंद्र पवार, यशवंत साटम, सुरक्षा घोसाळकर, विजय खामकर आणि इंद्रायणी सावंत यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हीच उजळणी नव्या भारताच्या शिक्षणविकासाची आहे!
उत्कृष्टतेकडे वाटचाल करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे यश संपूर्ण जोगेश्वरीचा अभिमान वाढवणारे ठरले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत