BREAKING NEWS
latest

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी...


 महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरु आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यास तयार असल्याचं खासगीत म्हटलं असल्याची माहिती आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारका संदर्भात राज ठाकरेशी उद्धव ठाकरे संवाद साधण्यास तयार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी १९९० च्या पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची भाषण संग्रहित केलेली होती. त्या वेळी टीव्ही नसल्यानं भाषणं ग्रामोफोन मध्ये रेकॉर्ड केली जात असतं. १९९० पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं जर राज ठाकरेंकडे असतील तर मी त्यांच्याशी संवाद साधायला तयार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी खासगीत दिल्याची माहिती आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या १९६६ ते १९९० पर्यंतची भाषणं राज ठाकरे यांच्याकडे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामासाठी आवश्यकता असल्यास राज ठाकरे यांना फोन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी खासगीत केलं असल्याची माहिती आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात बोलताना जे स्वत: लोकांचे फोन उचलत नाहीत त्यांच्या मनात या गोष्टी येतात. आमच्या सारख्या लहान कार्यकर्त्याचा फोन राज ठाकरे उचलतात. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी फोन उचलला जाणार नाही, असा विचार करु नये, असं संदीप देशपांडे म्हणाले. २०१७ ला आम्ही प्रस्ताव दिला होता, त्यावेळी त्यांनी फोन उचलला नव्हता, असं संदीप देशपांडे म्हणाले. शिवसेना ठाकरे गटासोबत युती करायची की नाही, याचा निर्णय राज ठाकरे घेतील, असं संदीप देशपांडे म्हणाले.

शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चा देखील पुन्हा जोर धरु लागलेल्या आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीसंदर्भातील चर्चा फेटाळल्या होत्या.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत