BREAKING NEWS
latest

राज्य नाट्य स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्यास मुदत वाढ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास दहा दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे यासंदर्भात विनंती करणारे निवेदन हौशी नाट्य कलावंत संघटनेने दिले होते. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन मुनगंटीवार यांनी प्रधान सचिवांच्या मार्फत सांस्कृतिक कार्य संचालनालयास कार्यवाहीचे निर्देश दिले.

हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाट्य तसेच दिव्यांग नाट्य या स्पर्धांसाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम  तारीख ६ नोव्हेंबर २०२३ होती. मात्र काही संघटनांनी या प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केलेली होती. या मागणीचा विचार करून मुनगंटीवार यांनी दहा दिवसाची मुदतवाढ देण्यात येत आहे अशी घोषणा केल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.

राज्य नाट्य स्पर्धेतील हिंदी, संस्कृत, संगीत, दिव्यांगनाट्य, बालनाट्य या स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असलेल्या संघानी ऑनलाइन पद्धतीने १५ नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत