BREAKING NEWS
latest

'मनसे' च्या दानशूर व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रल्हाद म्हात्रे यांच्या वाढदिवसादिनी गणेश नगर रिक्षा स्टँडचे उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२८: दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले डोंबिवली विधानसभा क्षेत्र १४३ चे अध्यक्ष तसेच माजी परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने डोंबिवली पश्चिमेकडील राजू नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या गणेश नगर रिक्षा स्टँडचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस आरिफ शेख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी प्रल्हाद म्हात्रे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 
यावेळी मनसे चे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, उप शहर अध्यक्ष संदीप (रामा) म्हात्रे, कल्याण ग्रामीण व डोंबिवली शहर विधानसभा जिल्हा संघटक अनिल वलेकर, भिवंडी लोकसभा प्रदेश उपाध्यक्ष अफसर भाई, भिवंडी लोकसभा सचिव अनिल बेलेकर, भिवंडी लोकसभा जिल्हा अध्यक्ष अजय भानुशाली, कल्याण ग्रामीण सरचिटणीस सतिश आमले, कल्याण ग्रामीण सरचिटणीस योगेश माने, डोंबिवली शहर चिटणीस साईराज लाड, डोंबिवली शहर आरटीओ प्रतिनिधी मयुर ठाकरे, डोंबिवली शहर चिटणीस ज्ञानेश्वर कच्छचे, रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष संजय डोंगरे, खजिनदार महेंद्र माळी, उपाध्यक्ष रूपेश काटे व गणेश जोशी, सल्लागार डोंबिवली शहर विधानसभा अगरवाल, ठाकुर्ली विभाग अध्यक्ष प्रदिप चौधरी, उप शहर अध्यक्ष प्रेम पाटील आदी मनसे समर्थक, कार्यकर्ते तसेच इतर रिक्षा चालक उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत