BREAKING NEWS
latest

ठाणे जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठका जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

 ठाणे दि.२४ : आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मा.अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांच्या उपस्थितीत समिती ठाणे जिल्हाधिकारी सभागृहात संपन्न झाली.
मतदार नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणूक शाखेने अमूल्य सहकार्य केल्याबद्दल या बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी महोदयांचे लेखी पत्र देऊन अभिनंदन केले व आभारही मानले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत