LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉ.मनोहर जोशी सर पंचतत्वात विलिन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई दि.२३ :  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ मनोहर जोशी सर हे आज पहाटे पंचतत्वतात विलिन झाले आहेत. दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये सरांना वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळून त्यांना देवाज्ञा झाली. दिनांक २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ऍडमिट केले गेले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. 

अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव देह माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील डब्लू ५४ या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेवण्यात येणार असून दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष डॉ.मनोहर जोशी सरांवर दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार होतील. मे २०२३ मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...