LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

कडोंमपा महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांचा सर्वकष स्वच्छता मोहीमेच्या अनुषंगाने कल्याण (पश्चिम) परिसरात पाहणी दौरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : मा.मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतील सर्वकष स्वच्छता मोहीम महापालिका क्षेत्रात नियमित स्वरुपात राबविण्यात येत आहे.या शहर स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीमेच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी काल कल्याण-शिळ रस्ता, काटई नाका ते दुर्गाडी पुलापर्यंत रस्त्याची पाहणी केली. कल्याण काटई नाका येथील ट्रॅफिक नियंत्रण अनुषंगाने चौकाचे फॅनिंग (चौक विस्तारीकरण इ.) तसेच चौकाचे नियोजन करुन या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले.
काटई नाका ते पत्रीपुल या मार्गावर दुतर्फा करण्यात आलेली खुदाई व पदपथावरील यावरील डेब्रिज उचलणे बाबत संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. पत्रीपुल ते दुर्गाडी किल्ला गोविंदवाडी बायपास रस्त्यामधील पुलाचे गर्डर तसेच लेबर शेड हटविणेबाबत एमएसआरडीसी विभागास निर्देश दिले असून, गोविंदवाडी बायपास रस्त्यावरील कचरा तसेच डेब्रिज उचलणेबाबत आणि संबंधीत तबेलेधारकासही सुचना देण्यात आल्या.

गोविंदवाडी-दुर्गाडी चौकात होणाऱ्या ट्रॅफीक नियोजन अनुषंगाने भटाळे तलाव येथील विकास योजनेतील रस्त्यातील अतिक्रमणे हटविणेबाबत संयुक्त मोहीम हाती घेण्याबाबत सुचना महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...