BREAKING NEWS
latest

१० वीच्या निकालाची तारीख जाहीर; असा पाहता येईल निकाल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे.

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत -

१.  https://mahresult.nic.in

२.  http://sscresult.mkcl.org
 
३.  https://sscresult.mahahsscboard.in

४.  https://results.digilocker.gov.in

५.  https://results.targetpublications.org

६.  https://www.tv9marathi.com

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.

गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी हे दहावीच्या निकालाची वाट पाहताना दिसले.अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून  आता २७ मे २०२४ रोजी दहावीचा निकाल हा जाहीर केला जाईल. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने निकाल विद्यार्थी पाहू शकतील. प्रत्यक्षात मार्कशीट विद्यार्थ्यांच्या हाती कधी पडणार याबद्दल मात्र वाट पाहावी लागणार आहे.

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं असून या परिपत्रकात निकालाबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत