BREAKING NEWS
latest

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला भरावा लागणार रुपये ५८४९ कोटींचा दंड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : आरोग्य सेवा उत्पादनांची निर्मिती करणारी जगातील अग्रगण्य कंपनी 'जॉन्सन अँड जॉन्सन'ला टॉल्कम पावडरच्या तपासणी बाबत तडजोड करण्यासाठी ५८४८ कोटींचा दंड भरावा लागणार आहे. अमेरिकेतील ४२ राज्ये आणि वॉशिंग्टन डीसी यांच्या चौकशीनंतर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी कंपनीने ७०० दशलक्ष डाॅलर (५८४९.४५ कोटी रुपये) सेटलमेंटला सहमती दिली आहे. बेबी पावडर आणि इतर टॉल्क आधारित उत्पादनांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असल्याबद्दल ही तपासणी होती.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या टॉल्कम उत्पादनांच्या सुरक्षेबाबत ग्राहकांची दिशाभूल केल्याच्या आरोपांनाही या तडजोडीमुळे पुष्ठी मिळते. कंपनीने सध्या या उत्पादनाची विक्री थांबवली आहे. मात्र, ही उत्पादने विक्री थांबवण्यापूर्वी शतकाहून अधिक काळ विकली जात होती. 'जॉन्सन अँड जॉन्सन'ने अमेरिकन राज्यांसोबत झालेल्या समझोत्या अंतर्गत कोणतीही चूक मान्य केलेली नाही. या तडजोड प्रक्रियेत फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलिना आणि टेक्सास या राज्यांतील नेते सामील होते. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांची टॉल्क उत्पादने सुरक्षित आहेत आणि त्यामुळे कर्करोग होत नाही.

फ्लोरिडा ॲटर्नी जनरल ॲशले मूडी यांनी एका निवेदनात म्हटले की, ग्राहक उत्पादनांच्या सुरक्षिततेसाठी ही एक मोठी प्रगती आहे. हे उल्लेखनीय आहे की जॉन्सन अँड जॉन्सन आपल्या टॉल्क उत्पादनांशी संबंधित मोठ्या प्रमाणात खटले हाताळत आहे. कंपनीवर ३१ मार्चपर्यंत सुमारे ६१,४९० व्यक्तींनी दावा दाखल केला आहे. यापैकी बहुतेक प्रकरणांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाने पीडित महिलांचा समावेश आहे. तर काही फिर्यादी 'एस्बेस्टोस'च्या संपर्कामुळे होणारा कर्करोग मेसोथेलियोमाशी संबंधित आहेत.

गेल्या वर्षीच 'जॉन्सन अँड जॉन्सन'ने पावडरचा प्राथमिक घटक म्हणून कॉर्न स्टार्च निवडून जगभरात टॉल्क-आधारित बेबी पावडरची विक्री थांबवली. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांची उत्पादने एस्बेस्टोस-मुक्त आहेत. या खटल्याचे व्यवस्थापन करण्याच्या प्रयत्नात 'जॉन्सन अँड जॉन्सन'ने त्यांच्या टॉल्क दायित्वे हाताळण्यासाठी एक उपकंपनी तयार केली आणि दोनदा दिवाळखोरी घोषित करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयात दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले. या मागील मे १ रोजी 'जॉन्सन अँड जॉन्सन'ने थर्ड दिवाळखोरी फाइलिंगद्वारे बहुतेक खटल्यांचे निराकरण करण्यासाठी ६.४८ अब्ज डाॅलर सेटलमेंटचा प्रस्ताव दिला. सर्व टॉल्क दायित्वे कव्हर करण्यासाठी कंपनीने ११ अब्ज डॉलर्स राखीव ठेवले आहेत.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत