LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्याच्या कामांचा केला पाहणी दौरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे व ब्रिजच्या सुरू असलेल्या कामांचा पाहणी दौरा करुन या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी संबंधित ठेकेदार यांना दिल्या.
 यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस.स्वामी, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मोहन पवार, भिवंडी उप-विभागीय अधिकारी अमित सानप, वाहतूक विभागाचे उप-आयुक्त विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, एमएमआरडीए कार्यकारी अभियंता श्री.किस्ते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ब्रिजची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावी. कामे पूर्ण करीत असताना वाहतूकीची कोंडी होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशाही सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...