विशेष वृत्त
न्याय रणभूमी डिजिटल
मंत्रालयात जायचंय? आधी ‘डिजीप्रवेश’ ॲपवर नोंदणी करा, नाहीतर प्रवेश बंद!
मार्च २८, २०२५
•
ताज्या घडामोडी
बातमी शेअर करा:
WhatsApp
Facebook
मुंबई, दि. २७ : मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून, आता प्रवेशासाठी ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲपचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे अभ्यागतांना आता पूर्वनियोजित वेळेनुसार आणि ठराविक विभागातच प्रवेश मिळणार आहे.
काय आहेत नवीन नियम?
अभ्यागतांना केवळ संबंधित विभागात आणि ठरलेल्या वेळेतच प्रवेश करता येणार.
अनधिकृत ठिकाणी फिरताना आढळल्यास कारवाई होणार.
मंत्रालयातील काम संपल्यावर निर्धारित वेळेत बाहेर पडणे बंधनकारक.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी विशेष सुविधा
दुपारी १२ वाजता प्रवेश दिला जाणार.
स्वतंत्र रांगेची सुविधा उपलब्ध.
वैध प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
सर्वसामान्य अभ्यागतांसाठी प्रवेश नियम
दुपारी २ नंतरच प्रवेश मिळेल.
‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे ऑनलाइन प्रवेश पास घ्यावा लागेल.
आधार कार्ड, वाहन परवाना किंवा पॅन कार्ड यांसारखे ओळखपत्र आवश्यक.
स्मार्टफोन नसलेल्या किंवा अशिक्षित व्यक्तींसाठी मदत केंद्र
‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे नोंदणी कशी करावी?
Play Store किंवा Apple Store वरून ॲप डाऊनलोड करा.
आधार क्रमांकाच्या आधारे छायाचित्र ओळख पटवून नोंदणी करा.
संबंधित विभागासाठी स्लॉट बुक करून QR कोड प्राप्त करा.
मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर QR कोड दाखवून RFID कार्ड मिळवा.
सुरक्षा तपासणी झाल्यावर प्रवेश मिळेल.
बाहेर जाताना RFID कार्ड परत करणे बंधनकारक.
नवीन प्रणालीचे फायदे
‘डिजीप्रवेश’ ॲपमुळे मंत्रालयात प्रवेश अधिक सोपा आणि सुरक्षित होणार असून, नवीन प्रणालीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
न्याय रणभूमी व्हॉट्सॲप ग्रुप
ताज्या बातम्या आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा!
जॉईन करा