BREAKING NEWS
latest

'अनिल आय हॉस्पिटल' चे डोंबिवली पश्चिम येथे सहाव्या शाखेचे दि.११ जानेवारी रोजी उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यातील नेत्रसेवेत गेली तब्बल ५४ वर्षे विश्वासार्ह सेवा देणारे 'अनिल आय हॉस्पिटल' आता डोंबिवली पश्चिम येथे आपल्या सहाव्या शाखेचे उद्घाटन करत आहे. हे नवीन अत्याधुनिक आय क्लीनिक ११ जानेवारी २०२६ रोजी उद्घाटनासाठी सज्ज होत आहे.
सन १९७२ साली सुरू झालेला 'अनिल आय हॉस्पिटल'चा प्रवास आज ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली (पूर्व), डोंबिवली (पश्चिम), ठाणे, कल्याण, निळजे पलावा, बदलापूर अशा विविध भागांमध्ये विस्तारला असून हजारो रुग्णांच्या विश्वासावर ही संस्था उभी आहे.

डोंबिवली पश्चिम येथील या नव्या शाखेमुळे परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटिना, ग्लॉकोमा, बाल नेत्रचिकित्सा व लेझर उपचार  यांसारख्या सर्व सुविधा आता घराजवळ उपलब्ध होणार आहेत. या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष नामदार श्री. रवींद्र चव्हाण  यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न होणार असून, श्री पर्नाद मोकाशी सह डोंबिवली व परिसरातील अनेक मान्यवर, डॉक्टर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

यावेळी बोलताना 'अनिल आय हॉस्पिटल'च्या संचालिका तथा महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर म्हणाल्या, “डोंबिवलीकरांचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास यामुळेच आम्ही सातत्याने पुढे वाटचाल करू शकलो. दर्जेदार व प्रगत नेत्रसेवा प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. लवकरच ठाणे येथे आमची सातवी शाखा सुरू होणार आहे.” डोंबिवली पश्चिम येथील ही नवीन शाखा परिसरातील नागरिकांसाठी आय केअर च्या दृष्टीने एक मोठी उपलब्धी ठरणार आहे.
दिनांक: ११ जानेवारी २०२६
वेळ: ११ ते २
पत्ता: अनिल आय हॉस्पिटल, तळमजला, घनश्याम कॉम्प्लेक्स, डीएनएस बँक जवळ, एमजी रोड डोंबिवली (पश्चिम)
संपर्क :
अनिल आय हॉस्पिटल
+91 99252 35969
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत