BREAKING NEWS
latest

कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळेश्वर मंदिरात महामृत्युंजय जप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली, दि. ४ फेब्रुवारी : कल्याण लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरात भक्तिमय वातावरणात महामृत्युंजय जपाचे आयोजन करण्यात आले होते.

या धार्मिक कार्यक्रमात त्यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य तसेच यशस्वी आणि लोकाभिमुख नेतृत्वासाठी महादेवाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमात भक्तीमय व सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळाले. या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी तसेच भाविक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी जपात सहभाग घेत सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

त्यावेळी आमदार राजेश मोरे, उप जिल्हा प्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक संजय पावशे, शाखा संघटक अपर्णा पावशे, प्रकाश म्हात्रे, प्रेमा म्हात्रे, सूरज राजन मराठे, पंढरीनाथ पाटील,  दिनेश शिवलकर, बालन मोरे, संतोष तळाशीकर, श्रीकांत कोर्ते, विजय दुधवडकर, स्वप्नील पाटील, सागर जेधे, केतकी पवार, अस्मिता खानविलकर, इंदिरा भोईर, उपजिल्हा संघटक, सुनील मालणकर, समस्त शिवसैनिक, महिला आघाडी, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत