डोंबिवली, दि. ५ फेब्रुवारी - माजी नगरसेवक संजय पावशे यांच्या शिवसेना शाखा कार्यालय, प्रभाग क्रमांक ६५ कोपरगाव अंतर्गत कै. लक्ष्मण कृष्णा पावशे सामाजिक संस्था (रजि.) यांच्या वतीने डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हळदी- कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हळदी- कुंकू कार्यक्रमांतर्गत महिलांना वाण म्हणून सुमारे ५ हजार पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत प्रभागातील वृद्ध नागरिकांनाही बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना भगवा फेटा ही बांधण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. एकत्र येत सणासुदीचा उत्साह साजरा करण्याची संधी मिळाल्याने महिलांनी आयोजकांचे आभार मानले. सामाजिक उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांशी नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून दिसून आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थेचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा