LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडल्याने खासदार श्रीकांत शिंदेंनी यंदा 'रासरंग' दांडिया उत्सव रद्द करण्याचा घेतला महत्वाचा निर्णय..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - महाराष्ट्रावर यंदा दुष्काळाचे सावट पसरले आहे. 'एल निनो'च्या प्रभावामुळे परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मान्सूनच्या अवकृपेमुळे केवळ खरिपाची पिकेच हातातून गेली नाहीत, तर रब्बीच्या पेरण्यांवरही टांगती तलवार निर्माण झाल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडलेला असताना, या संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डोंबिवलीतील प्रसिद्ध आणि अत्यंत लोकप्रिय मानला जाणारा ‘रासरंग’ दांडिया उत्सव यंदा पूर्णपणे रद्द करण्यात आला असून, उत्सवाचा संपूर्ण निधी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘रासरंग’ उत्सव का रद्द करण्यात आला ?

दरवर्षी नवरात्रीच्या काळात डोंबिवलीतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर ‘नवदुर्गा मित्र मंडळ’ आणि ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रासरंग’ दांडिया महोत्सवाचे दिमाखदार आयोजन केले जाते. या महोत्सवात लाखो नागरिक आणि तरुण-तरुणी हिरिरीने सहभागी होतात. मात्र, यंदा संपूर्ण राज्यातील बळीराजा अस्मानी संकटाशी दोन हात करत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या या निर्णयाची अधिकृत माहिती दिली.

संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, राज्यात शेतकरी चिंतेत असताना कोट्यवधी रुपये खर्चून दांडिया आयोजित करणे अयोग्य ठरेल. दांडिया, स्टेज, लाईट्स आणि संगीतावर होणारा मोठा खर्च आता थेट गरजू व बाधित शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचवला जाईल. कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या भागाला आणि कशा स्वरूपात (बियाणे, चारा किंवा थेट आर्थिक मदत) साहाय्य करायचे, याचे आराखडे सध्या तयार केले जात आहेत.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून, विशेषतः बळीराजाकडून आणि सामाजिक वर्तुळातून मोठे कौतुक होत आहे. ‘रासरंग’चा हा निर्णय इतर सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांसाठीही एक आदर्श वस्तुपाठ ठरला आहे.
नवरात्रोत्सवात धार्मिक विधींवर देणार भर

नवरात्रोत्सवाच्या काळात यंदा धार्मिक विधींवर भर देण्यात येणार असून देवीची आराधना करताना महाराष्ट्रातील शेतकरी सुखी राहावा, राज्यात चांगला पाऊस पडावा आणि राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे अशी प्रार्थना केली जाणार आहे. विविध धार्मिक विधी आणि होमहवनांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी स्पष्ट केले. तर उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनीही शेतकरी संकटात असताना सांस्कृतिक कार्यक्रमांवरील खर्चाला विराम देऊन सामाजिक जबाबदारी जपण्याची भूमिका मांडली. यापूर्वीही नैसर्गिक आपत्तीच्या काळात कल्याण लोकसभा मतदारसंघातून पूरग्रस्त भागात मदत पाठविण्यात आल्याचे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...