मुंबई : मुंबईतील तब्बल १३ पोलीस ठाण्यांची धुरा महिला अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेली असून त्या ही जबाबदारी लीलया पेलत आहेत. इतक्या मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याचे ‘इनचार्ज’ पद महिला अधिकाऱ्यांकडे देणारे मुंबई पोलीस दल देशातील पहिले पोलीस दल ठरले आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी मुंबईतील १३ पोलीस ठाण्यांची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. ‘प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. महिला सशक्तीकरण ही भूमिका आहेच; पण त्याचबरोबर बालके, कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अत्याचार याप्रकारचे गुन्हे हाताळण्यात या महिला अधिक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत,’ असे देवेन भारती यांनी सांगितले.
महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे जबाबदारी
शीव - सरिता तावडे,
पंतनगर - लता सुतार,
ताडदेव - मीना जगताप,
व्ही.पी.रोड - सीमा गायकवाड,
वर्सोवा - दीपशिखा वारे,
विलेपार्ले - प्रिया थोरात,
मालवणी - राणी पुरी,
खेरवाडी - सुप्रिया पाटील, कांजुरमार्ग - सविता शिंदे,
चुनाभट्टी - मनीषा कुलकर्णी, बोरिवली - पुष्पलता मंडले, भोईवाडा - साधना पाटील,
भांडुप - सपना क्षीरसागर
मुंबई पोलीस दलात रेणुका बुवा, सुमन चव्हाण, माधुरी यादव-पाटील, प्राची कर्णे, मधु घोरपडे या एसीपी पदाची जबाबदारी पार पाडत आहेत. आर. रागसुधा, पौर्णिमा चौगुले, शिला साईल, दीपाली धाटे या उपायुक्त तर मोक्षदा पाटील अतिरिक्त आयुक्त आहेत.
सहा सहआयुक्तांपैकी ‘गुप्तवार्ता’ची जबाबदारी डॉ. आरती सिंह यांच्याकडे आहे.