LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

बोरिवलीत ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ ८० रायडर्सचा सहभागात ‘हेल्मेट वापरा, सुरक्षित प्रवास करा!’ च्या जनजागृती रॅलीचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

बोरिवली : महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा ज्योत यात्रा’ उपक्रमाच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरिवली यांच्या वतीने शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) हेल्मेट जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये सुमारे ८० रायडर्सनी सहभाग घेत नागरिकांना रस्ता सुरक्षेचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.

प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळिव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीचा शुभारंभ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. सकाळी ७.५० वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरिवली येथून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली लिंक रोडवरील मॅकडोनाल्ड, कांदरपाडा मेट्रो स्टेशन, मंडपेश्वर मेट्रो स्टेशन आणि एक्सर मेट्रो स्टेशन या मार्गांवरून काढण्यात आली. मुंबई रायडर्स क्लब (MRC), 'Brotherhood of Tourers' आणि 'Red Line Riders' या रायडर्स ग्रुपचे सदस्य हेल्मेट परिधान करून रॅलीत सहभागी झाले होते.
हेल्मेट वापरण्याचे नागरिकांना आवाहन

दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आणि सुरक्षित वाहनचालनेला प्राधान्य देणे, या बाबींविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. हेल्मेटमुळे अपघाताच्या वेळी डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापतींचा धोका कमी होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतःच्या आणि सहप्रवाशाच्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविणाऱ्या रायडर्सना त्यांच्या योगदानाबद्दल प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, कार्यालयीन कर्मचारी आणि चालक उपस्थित होते.

रॅलीचे आयोजन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी बोरिवली वाहतूक शाखा आणि MHB पोलीस ठाण्याचे मोलाचे सहकार्य लाभले. ‘हेल्मेट वापरा, सुरक्षित प्रवास करा!’ या घोषवाक्याद्वारे बोरिवलीत रस्ता सुरक्षा जनजागृतीचा प्रभावी उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून अपघातमुक्त प्रवासासाठी सहकार्य करावे, हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...