LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

दाक्षिणात्य कलाकारांच्या सादरीकरणाने डोंबिवलीत रंगला ‘श्रीदेवी महिषासुरमर्दिनी’चा भव्य नाट्याविष्कार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने डोंबिवली पूर्वेतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर आयोजित शारदीय नवरात्रोत्सवात बंगळुरू येथील कलावंतांनी ‘श्रीदेवी महिषासुरमर्दिनी’ हा विशेष नाट्याविष्कार सादर केला. देवीशक्तीचा महिमा आणि अधर्मावरील धर्माच्या विजयाचे दर्शन घडविणाऱ्या या सादरीकरणाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पारंपरिक वेशभूषा, प्रभावी अभिनय, नृत्य आणि भक्तिभाव यांच्या सुरेख संगमातून कलावंतांनी महिषासुरमर्दिनीची पौराणिक कथा साकारली. या नाट्याविष्कारातून भारतीय संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा अनुभवण्याची संधी डोंबिवलीकरांना मिळाली.
संस्कृती आणि परंपरांचे जतन करणाऱ्या अशा कलाविष्कारांना प्रोत्साहन मिळणे महत्त्वाचे आहे, असे मत खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. या सादरीकरणामुळे नवरात्रोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात विशेष रंगत आली.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...