कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 10 प्रभाग क्षेत्र समिती सभापती पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी (ठाणे) डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष सभेत 10 सभापतींची निवड जाहीर करण्यात आली.
या निवडणुकीत ५ प्रभागात शिवसेना, ४ प्रभागात भाजप आणि १ प्रभागात मनसे चे वर्चस्व राहिले.
प्रभागनिहाय विजयी सभापतींची यादी -
1) 1/अ प्रभाग - बंदेश नारायण जाधव – शिवसेना
2) 2/ब प्रभाग - सुप्रिया प्रभुनाथ भोईर – शिवसेना
3) 3/क प्रभाग - मेघाली सचिन खेमा - भाजपा
4) 4/जे प्रभाग - दर्शना समिप काळे - शिवसेना
5) 5/ड प्रभाग - शीतल महेश मंडारी - मनसे
6) 6/फ प्रभाग - मंदा सुभाष पाटील – भाजपा
7) 7/ह प्रभाग - डॉ. रविना राहुल म्हात्रे - भाजपा
8) 8/ग प्रभाग - सुरज राजन मराठे - शिवसेना
9) 9/आय प्रभाग - सरोज मनोज राय – भाजपा
10) 10/ई प्रभाग - अर्जुन बाबु पाटील – शिवसेना
८ जण बिनविरोध विजयी
एकमेव अर्ज दाखल झाल्याने 4 प्रभागात बिनविरोध निवड झाली -
- 1/अ - बंदेश नारायण जाधव (शिवसेना)
- 4/जे - दर्शना समिप काळे (शिवसेना)
- 5/ड - शीतल महेश मंडारी (मनसे)
- 6/फ - मंदा सुभाष पाटील (भाजपा)
तर इतर ४ प्रभागात विरोधकांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड झाली
3/क प्रभागात शिवसेनेचे प्रतिक पेणकर आणि NCP चे रमिज मणियार यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाच्या मेघाली खेमा बिनविरोध.
7/ह प्रभागात मनसेचे संदेश पाटील आणि शिवसेनेच्या रेखा म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाच्या डॉ. रविना म्हात्रे बिनविरोध.
8/ग प्रभागात भाजपाच्या अॅड. कविता म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे सुरज मराठे बिनविरोध.
10/ई प्रभागात भाजपाच्या रविना माळी यांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे अर्जुन पाटील बिनविरोध.
२ ठिकाणी मतदान
2/ब प्रभाग: शिवसेना (उबाठा) स्वप्नाली केणे - 4 मते, शिवसेना सुप्रिया भोईर - 8 मते. सुप्रिया भोईर विजयी.
9/आय प्रभाग: शिवसेना (उबाठा) निलेश खंबायत - 2 मते, भाजपा सरोज राय - 8 मते. सरोज राय विजयी.