LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

भाजपाची ठाणे पक्ष कार्यालयात विभागीय बैठक संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे विभागीय संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला, तसेच आगामी पक्षकार्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी पुढील वाटचालीसाठी आवश्यक विषयांवर उपस्थितांशी रवींद्र चव्हाण यांनी संवाद साधला. 
ठाणे येथील पक्ष कार्यालयात झालेल्या या बैठकीप्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री अजय जामवाल, सहसंघटन मंत्री सतीश धोंड, खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आमदार माधवीताई नाईक, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे, ठाणे-कोकण विभाग सहसंयोजक संजय वाघुले, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब आदी मान्यवरांसह ठाणे विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...