LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या 'रामायण' चित्रपटाच्या ऍडव्हान्स बुकिंगमध्येच ५ कोटींच्या टप्पा पार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि. २१ : चार हजार कोटींचे प्रचंड बजेट असलेला नमित मल्होत्रा निर्मित आणि रणवीर-साई पल्लवी, यश यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रामायण’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शीत या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या काही तासांतच या सिनेमाने ब्लॉक केलेल्या सीटसह ५.४४ कोटी रुपयांचा (एकूण ग्रॉस कलेक्शन ३.६१ कोटी रुपये) टप्पा ओलांडला आहे.

देशभरातील शंभरहून अधिक शहरांमध्ये आतापर्यंत तब्बल ९२,००० हून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. एकूण बुकिंगमध्ये ९५ टक्के हिस्सा (सुमारे ५.१६ कोटी रुपये) केवळ हिंदी भाषेतील शोचा आहे. याशिवाय, कन्नड आणि तेलुगु व्हर्जनसाठीही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटाची जादू IMAX 3D आणि मोठ्या पडद्यावरील भव्यतेमुळे द्विगुणित झाली आहे. प्रेक्षकांचा वाढता उत्साह पाहता प्रमुख शहरांमध्ये तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईतील लोअर परेल येथील प्रसिद्ध PVR ICON सारख्या मल्टिप्लेक्समध्ये IMAX 3D रिक्लाइनर सीटचे तिकीट चक्क २,७७० रुपयांपर्यंत विकले जात आहे.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...