LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

दिग्गज अभिनेते 'नटसम्राट' नाना पाटेकर पंचत्वात विलीन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुणे - मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूड गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे पार्थिव पंचत्वात विलीन झाले. त्यांच्या पार्थिववार आज रात्री पुण्यातील डोणजे गावी त्यांच्या फार्महाऊसवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यात त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील डोणजे येथे आणण्यात आले. येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाना पाटेकर एका कार्यक्रमासाठी बुधवारी गोव्यात होते. अचानक गुरूवारच्या मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी मेसेज करून मित्राला बोलवले. त्यांचा मित्र आला, त्याने नानांना तातडीने रुग्णालयात नेले. तेथे ४५ मिनिटे नानांचा सीपीआर देण्यात आला, पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

गोव्यातील वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव रात्रीच्या सुमारास पुण्यात आणण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप दिला. त्यानंतर नाना पाटेकर यांचे पार्थिव पुणे ग्रामीण भागातील डोणजे गावातील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. डोणजे येथील त्यांच्या फार्महाऊसवर त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन आणि त्यानंतर अंत्यसंस्कार झाले.

नाना पाटेकर यांचे डोणजे येथील फार्महाऊसशी विशेष नाते होते. याच ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्याची व्यवस्था करण्यात आली. पार्थिव पुण्यात दाखल झाल्यानंतर ते डोणजेकडे नेले गेले. त्यानंतर चाहत्यांना व आप्तेष्टांना अंत्यदर्शन झाले. शासनातर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, माधुरी मिसाळ, सुनील तटकरे आदी नेतेमंडळींनी पुष्पचक्र अर्पण करून नाना पाटेकरांना मानवंदना वाहिली.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...