LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

सामायिक ७/१२ जमीन विक्रीसाठी आता सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि. २२ : सामाईक सातबारा असलेल्या जमिनीतील हिस्स्याची विक्री करताना सर्व सहहिस्सेदारांची लेखी संमती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच भूमी अभिलेख विभागाची मोजणीची ‘क’ प्रत व ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. ही कागदपत्रे नसतील तर दुय्यम निबंधकांना नोंदणी व्यवहार नोंदविता येणार नाहीत.

विक्री व्यवहारातील फसवणूक टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला. अनेकदा सामायिक जमिन व्यवहारात एका हिस्सेदाराने इतर सहहिस्सेदारांना न कळवता किंवा त्यांची परवानगी न घेता खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्यामुळे पक्षकारांमध्ये गंभीर वाद निर्माण होत असतात. यामुळे महसूल कार्यालये आणि न्यायालयांमध्ये याचिकांची संख्या प्रचंड वाढली जात होती.

शासनाच्या या नवीन निर्णयामुळे खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता येईल, कौटुंबिक व आपापसांतील वाद टळतील आणि सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक थांबून त्यांना कोर्टबाजीच्या नाहक त्रासापासून मोठा दिलासा मिळणार आहे. महसूल विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व दुय्यम निबंधकांना नोंदणी प्रक्रियेसाठी अटी लागू करण्यात आल्या आहेत.

१. मोजणीची ‘क’ प्रत असल्यास : विक्री करणाऱ्या सहहिस्सेदाराने भूमी अभिलेख विभागाकडून मिळालेली अधिकृत मोजणीची ‘क’ प्रत खरेदीखतासोबत जोडली असल्यास, इतर सहहिस्सेदारांच्या संमतीपत्राची किंवा ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी न करता दस्ताची नोंदणी केली जाईल.

२. मोजणीची ‘क’ प्रत नसल्यास : जर मोजणीची ‘क’ प्रत जोडलेली नसेल, तर सामाईक ७/१२ उताऱ्यावरील इतर सर्व सहहिस्सेदारांचे लेखी संमतीपत्र जोडल्याशिवाय दुय्यम निबंधकांना खरेदीखताची नोंदणी करता येणार नाही.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...