LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

हवामान खात्याकडून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि.१९ : ऑक्टोबर हिटमुळे वैतागलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणि दुष्काळामुळे होरपळलेल्या बळीराजाला आयएमडी (IMD) ने दिलासादायक बातमी दिली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, पुढील २४ तासांमध्ये हे कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र होणार आहे. याचा परिणाम म्हणून हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुडुचेरीमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. या काळात विजांचा कडकडाट तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडणार असून, वाऱ्याचा वेग देखील ताशी ६० किमी. पर्यंत राहू शकतो असं हवामान विभागाने म्हटलं आहे, या राज्यांमध्ये पुढील पाच दिवस अशीच स्थिती राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला आयएमडी (IMD) ने दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून, जोरदार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील सातारा, सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

मात्र उत्तर भारतात या काळात हवामान कोरडं राहणार आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हवामान पूर्णपणे कोरडं राहणार असून, पावसाची शक्यता कमी आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये येत्या २२ ते २५ ऑक्टोरपर्यंत आणि उत्तराखंडमध्ये २३ ते २५ ऑक्टोबरपर्यंत काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये देखील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...