LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार करार लागू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. २७ एप्रिलला या करारावर उभय देशांकडून स्वाक्षरी झाली होती. यामुळे वस्त्रोद्योग आणि चर्मोद्योग यांसारख्या कामगारप्रधान क्षेत्रांमधील उत्पादनांसह विविध भारतीय वस्तूंना शुल्कमुक्त प्रवेश मिळाला आहे. पहिल्याच दिवसापासून भारताच्या १०० टक्के निर्यातीला न्यूझीलंडमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळाल्यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठी स्पर्धात्मक आघाडी मिळाली आहे.

या क्षेत्रांना होणार फायदा

वस्त्रोद्योग आणि पोशाख, चर्मोद्योग आणि पादत्राणे, 
अभियांत्रिकी वस्तू, ऑटो घटक, रत्ने आणि दागिने
कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न औषध निर्माण
गेल्या पाच वर्षांत अंमलात आलेला हा सातवा व्यापार करार आहे. यापूर्वी संयुक्त अरब अमिराती, मॉरिशस, युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन गट, ब्रिटन, ओमान आणि ऑस्ट्रेलियासोबत अशा प्रकारचे करार झाले आहेत. यामुळे वस्त्रोद्योग आणि चर्मोद्योग यांसारख्या कामगारप्रधान क्षेत्रांमधील उत्पादनांसह विविध भारतीय वस्तूंना शुल्कमुक्त प्रवेश मिळाला आहे. हा करार भारताचा १७ वा कार्यरत मुक्त व्यापार करार ठरला आहे.

मागील आर्थिक वर्षातील १.३ अब्ज डॉलरवरून द्विपक्षीय व्यापार २०२५-२६ मध्ये ११ टक्क्यांनी घसरून १.१५ अब्ज डॉलरवर आला. भारताची निर्यात ५६६.५१ दशलक्ष डॉलर आणि आयात ५८९.१ दशलक्ष डॉलर राहिल्यामुळे भारतासाठी २२.५९ दशलक्ष डॉलरची तुटपुंजी व्यापारी तूट निर्माण झाली.

न्यूझीलंडच्या नागरिक राणी सिंग म्हणाल्या की, करार दोन्ही देशांना जवळ आणणारा, व्यवसाय, लोकांसाठी संधी निर्माण करणारा महत्त्वाचा टप्पा आहे. वस्तूंव्यतिरिक्त शिक्षण, पर्यटन, तंत्रज्ञान, व्यावसायिक सेवा आणि गुंतवणूक या क्षेत्रांतही सहकार्याला मोठा वाव आहे.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...