LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

गुंतवणूकीदारांसाठी देशातील सर्वात मोठा IPO आजपासून खुला..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि. २१ : भारतीय भांडवली बाजारात बहुप्रतिक्षित Jio प्लॅटफॉर्म्सचा IPO आजपासून (२१ ऑक्टोबर) गुंतवणूकीदारांसाठी खुला झाला आहे. गुंतवणूकदारांना शुक्रवार, २३ ऑक्टोबरपर्यंत या सार्वजनिक विक्रीमध्ये अर्ज करता येणार आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सार्वजनिक समभाग विक्रीचा विक्रम ठरत असून बाजारातील विश्लेषक आणि किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

या विक्रमी IPO द्वारे कंपनी सुमारे २७ कोटी नव्या शेअर्सची विक्री करून तब्बल ₹३०,२१३ कोटी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवून मैदानात उतरली आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये ह्युंदाई मोटर इंडियाने ₹२७,८०० कोटींचा सर्वात मोठा सार्वजनिक निधी उभारला होता, तो विक्रम आता जिओ मोडीत काढत आहे.

दूरसंचार क्षेत्रातील आघाडीचे स्थान, ब्रॉडबँड विस्तार, क्लाउड तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भविष्यातील संधी यामुळे कंपनीची वाढ वेगाने होईल, असा विश्वास विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

या निधीचा मोठा हिस्सा 'रिलायन्स जिओ इन्फोकॉम'वरील जुने कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात येणार आहे. ताज्या समभाग विक्रीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्समधील रिलायन्स इंडस्ट्रीजची हिस्सेदारी ६६.४३ टक्क्यांवरून घसरून सुमारे ६४.४ टक्क्यांवर येईल; मात्र तरीही बहुसंख्य मालकी आणि नियंत्रण रिलायन्सकडेच अबाधित राहील.

कंपनीने प्रत्येक शेअरसाठी ₹१,०६५ ते ₹१,११९ असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. कमाल किंमतीनुसार कंपनीचे अंदाजे मूल्यांकन सुमारे १०८.३ अब्ज डॉलर्स (सुमारे ₹१०.३ लाख कोटी) इतके ठरवले गेले आहे. शेअर्सचे वाटप सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी निश्चित होण्याची शक्यता आहे, तर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारावर बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी शेअर्सची थेट नोंदणी होईल. पात्र कर्मचाऱ्यांसाठी ₹५०० कोटींचे समभाग राखीव ठेवण्यात आले असून त्यांना सुमारे ५ टक्के सवलत मिळेल. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विद्यमान भागधारकांसाठी ₹२,५०० कोटींचा स्वतंत्र कोटा ठेवण्यात आला आहे.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...