LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

जागतीक विक्रम नोंदवत Jio च्या IPO साठी १ कोटीहून अधिक अर्ज सादर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई, दि. २३ : जागतिक विक्रम नोंदवत Jio च्या IPO ला जगभरातून १ कोटीहून जास्त गुंतवणूकदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज मिळवणारा Jio प्लॅटफॉर्म्सचा IPO हा जगातील पहिलाच IPO ठरला आहे याआधी हा रेकॉर्डपारी एनर्जीज (Waaree Energies) च्या नावावर होता. या वारीला सुमारे ९७ लाख अर्ज मिळाले होते. बजाज हाऊसिंग फायनान्स आणि BCCL सारख्या भारतीय IPO ने देखील अर्जाच्या बाबतीत रेकॉर्ड स्थापन केले होते. ज्यांना प्रत्येक ९० लाख अर्ज मिळाले होते. आज दुपारी 12.03 वाजेपर्यंत जिओ प्लॅटफॉर्म्सच्या आयपीओसाठी उपलब्ध असलेल्या 19.75 कोटी समभागांच्या तुलनेत 136.32 कोटी समभागांसाठी बोली लावण्यात आली होती. पीटीआयच्या वृत्तानुसार यामुळे आयपीओ एकूण जवळपास 7 पट सबस्क्राइब झाला होता. जिओ प्लॅटफॉर्म्स या आयपीओतून सुमारे 30,213 कोटी रुपये उभारणार आहे. या माध्यमातून कंपनीचे मूल्यांकन अंदाजे 108 अब्ज डॉलर इतके होणार आहे. या समभाग विक्रीत मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड किंवा कंपनीच्या इतर विद्यमान भागधारकांकडून कोणतेही समभाग विकले जात नाहीत.

जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ एकूण ३०,२१३ कोटी रुपयांचा आहे.यात कंपनी २७ कोटी नवीन इक्विटी शेअर जारी करत आहे. यात सध्याच्या शेअरधारकांच्या वतीने शेअर विकण्याचा कोणताही प्रस्ताव सामील नाही. आयपीओसाठी एक शेअरचा प्राईस बँड १,०६५ रुपयांवरुन १,११९ रुपय निश्चित केले आहे. अपर प्राईजच्या आधारावर कंपनीचा मार्केट कॅप १०.३ लाख कोटी रुपयांचा आहे. रिटेल गुंतवणूकदाराना किमान १२ शेअर्ससाठी अर्ज करावा लागणार आहे. १,११९ रुपये प्रति शेअरची वरची किंमतीच्या हिशेबाने किमान गुंतवणूक १३,४२८ रुपये आहे. गुंतवणूकदारा १२ शेअरच्या पटीत आवेदन करु शकतो. शेअर्सच्या अलॉटमेंट २६ ऑक्टोबर रोजी अंतिम होण्याची शक्यता आहे. तर BSE आणि NSE वर यांनी लिस्टिंग २८ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित आहे.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...