आज दुपारी मुंबईच्या आरे ब्रिजवर एक धक्कादायक अपघात घडला. महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा सेनेचे चिटणीस अशोक डांगे यांचा डंपरखाली येऊन जागीच मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेने मनसेत शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक भालचंद्र अंबुरे आणि मनसे विभाग अध्यक्ष संदीप ढवळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातस्थळाची पाहणी करून आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान, आरे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. अपघात कसा आणि कशामुळे घडला, याचा शोध घेतला जात आहे.
"अशोक डांगे यांच्या अचानक जाण्याने मनसेला मोठा धक्का – हा फक्त अपघात की कोणाची निष्काळजीपणा?" असा प्रश्न सध्या दक्ष नागरिकांना पडला आहे.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा सेनेचे सरचिटणीस देवेंद्र पाटील यांनी देखील शोककळा व्यक्त केली आहे.