BREAKING NEWS
latest

चालू आर्थिक वर्षात १.३६ लाख कोटींची जीएसटीची चोरी प्रकरणे..

प्रतिनिधी: अवधूत सावंत
   
नवी दिल्ली : जीएसटीची चोरी रोखण्यासाठी अर्थ मंत्रालय आता कठोर कारवाई मोहिम हाती घेतली आहे. बिले तयार करण्यासह इतर मार्गांनी व्यापारी जीएसटी चुकवत असल्याचे आढळून आले आहे. चालू आर्थिक वर्षात १.३६ लाख कोटी रुपयांची चोरी उघडकीस आल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १४ हजार कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटची एकूण १०४० प्रकरणे उघडकीस आली असून त्यात आतापर्यंत ९१ जणांना अटक करण्यात आली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण १.३६ लाख कोटी रुपयांची जीएसटी चोरी आढळून आली आहे, ज्यामध्ये बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचाही समावेश आहे आणि लोकांनी स्वेच्छेने १४,१०८ कोटी रुपये जमा केले आहेत.

जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने जीएसटीचोरी शोध मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट दाव्यांची प्रकरणे शोधून काढली आहेत. डीजीजीआयने गेल्या साडेतीन वर्षांत ५७,००० कोटी रुपयांची जीएसटी चोरी शोधली असून या प्रकरणात ५०० जणांना अटकही करण्यात आली आहे.

जून २०२३ मध्ये, डीजीजीआय   ने देशभरातील सिंडिकेटचे मास्टरमाइंड ओळखून त्यांना अटक करण्यावर भर दिला होता. तांत्रिक साधनांद्वारे डेटा ऍनालिस्टिक्स वापर करून जीएसटी चुकवणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. हे टॅक्स सिंडिकेट अनेकदा साध्याभोळ्या सामान्य लोकांचा वापर करतात आणि त्यांना नोकरी, कमिशन, बँक कर्ज देण्याचे आमिष दाखवतात आणि त्यांच्याकडून केवायसी कागदपत्रे घेतात ज्याद्वारे त्यांच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय बनावट, शेल फर्म किंवा कंपन्या उघडल्या जातात.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत