डोंबिवली - कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत रिंगरूट बनवला जात असून त्या विकासकामांसाठी स्थानिक भूमिपुत्र यांच्या जागेतून तो बनवला जातं असून सदर रिंगरूट बाधित शेतकऱ्यांना त्या बाधित जागेचा मोबदला मिळावा म्हणुन उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून त्यावर रिंगरूट बाधित शेतकऱ्यांनी अपील सुद्धा केले आहे.
२०२३ च्या अखेरीस उच्च न्यायालयात अपील केलेली असताना की रिंगरूट बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणुन काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मध्यस्थी करून त्यांनी सुद्धा सांगितले की रिंगरूट बाधित शेतकऱ्यांनी ज्यांनी तक्रारी केल्या आहेत त्यांना त्याचा काहीतरी मोबदला मिळेल याचा आम्ही पाठपुरावा करू. पण तसं काहीच न होता तीन ठिकाणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकारी आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांनी त्या जागेत घुसून खोदकाम करत भरणी टाकत असल्याचे बघून ते आम्हांस खटकत आहे की बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व मोबदला न मिळता माननीय उच्चं न्यायालयाच्या आदेशाचं भंग करत अवमान करीत असल्याने आम्ही पुन्हा न्यायालयात व पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जातं असल्याचे दयानंद म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
यावेळी या बाधित शेतकऱ्यांमध्ये राजू काथोड म्हात्रे, दयानंद अनंत म्हात्रे, गोपाळ गोविंद भोईर, हेमकांत बाबू म्हात्रे, जयवंत मुकुंद जोशी, हरी दत्तू म्हात्रे, नाना गंगाराम पाटील, सुनील राजाराम खारे हे या एल्गारात उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा