BREAKING NEWS
latest

शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शहर शाखेत हिंदुह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९८ वी जयंती उत्साहात साजरी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२३: हिंदुह्रदयसम्राट, सरसेनापती, शिवसेनाप्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची ९८ वी जयंती आज शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत शहर प्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य उपस्थितीत श्रध्देने आणि उत्साहाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहर विधानसभा समन्वयक व रावेर लोकसभेचे निरीक्षक विजय देशमुख, माजी नगरसेवक व उपशहर प्रमुख संजय पावशे, आणि शहर प्रमुख राजेश गोवर्धन मोरे या मान्यवरांनी आदरणीय बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन करून "हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ! शिवसेना जिंदाबाद ! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो ! शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे यशस्वी व तडफदार मुख्यमंत्री सन्माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांचा विजय असो ! कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो !" या घोषणांनी शहर शाखेचा परिसर दुमदुमून गेला.
       
या सोहळ्याच्या प्रसंगी उपरोक्त मान्यवर पदाधिकाऱ्यांसोबत पंढरीनाथ पाटील, गजानन व्यापारी, संतोष चव्हाण, सागर जेधे, अरविंद वत्रे, सागर बापट, संतोष तळाशिलकर, धर्मराज शिंदे, दिनेश शिवलकर, सौ. स्वातीताई हिरवे, केतकी ताई पोवार, शैलेश चव्हाण, माजी विभागप्रमुख सुनील मालणकर, सौ. सुप्रिया गणेश यादव, प्राची परब,  सौ. प्राजक्ता मोहिते, सुनिता बिलीडगे, पुष्पा जाधव, कुमारी गीतांजली सुनील मालणकर, गजानन खंडू सकट, रमेश नायक, स्वाती पोलडिया, इरशाद अहमद, गुलाब म्हात्रे, अपर्णा हेंद्रे, लतिका पाटील, जनिता दाभाडे, बालन मोरे, श्रीकांत कोडते, दिलीप विश्वकर्मा, विष्णू भालेराव, संदेश चव्हाण, हरिश्चंद्र कांबळे, पिराजी काकडे, राकेश जगे, प्रदीप सुधाकर पवार, उषाताई आचरेकर, विद्या यशवंत भावसार, यशवंत भावसार, संजय विचारे, गोरखनाथ उर्फ बाळा म्हात्रे, संदीप सामंत, प्रवीण बाबू पवार, निषाद पाटील, सौ. प्रतिक्षा प्रकाश माने, सौ. त्रिवेणी भेकरे, सौ. सरिता पडवेकर, संजीव ताम्हाणे, प्रकाश शेट्टी, कपिल पुजारी, कार्यालयीन कर्मचारी, रोहित जमादार आणि कार्यालय प्रमुख प्रकाश शांताराम माने तसेच शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक श्रद्धेने व उत्साहाने उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत