LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

ठाण्यात भाजप आयोजित 'लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव' च्या भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे, ता. १ - भारतीय जनता पक्षाने (भाजप) आयोजित केलेल्या लोकशाही बचाव पदयात्रेस ठाण्यात जोरदार प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी प्रमुख नेते तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

विरोधकांकडून सुरू असलेल्या झुंडशाही आणि भिडतंत्राचा निषेध करण्यासाठी तसेच लोकशाही, संविधान आणि सामाजिक सुव्यवस्था जपण्याचा संदेश देण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात घोषणा दिल्या. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, ठाण्यातील स्थानिक नेते नरेश मस्के, प्रताप सरनाईक आणि गणेश नाईक हे देखील या प्रसंगी उपस्थित होते. भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते, ज्यामुळे ठाण्यातील वातावरण भाजपमय झाले होते.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...