LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

कल्याण-उल्हासनगरवासीयांना दिवाळीची मेट्रो भेट !!

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - कल्याण, भिवंडी, उल्हासनगर परिसरातील नागरिकांचे मेट्रोचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. मेट्रो मार्गिका ५ च्या पुढील टप्प्यांसह मेट्रो ५अ च्या उभारणीसाठी निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. या मेट्रो मार्गिकांचा कल्याण आणि उल्हासनगरपर्यंत विस्तार व्हावा, यासाठी  सातत्याने शासन आणि एमएमआरडीएच्या स्तरावर संसदरत्न खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला. वेळोवेळी बैठका घेऊन प्रकल्पाच्या मार्गरेखेला मान्यता मिळवून देण्यापासून ते प्रत्यक्ष कामाच्या प्रक्रियेला गती देण्यापर्यंत प्रयत्न केले. या प्रयत्नांना आता महत्त्वाचे यश मिळाले आहे.

या प्रकल्पामुळे भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील नागरिकांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मेट्रो ५ आणि ५ अ मुळे ठाणे ते भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथदरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होईल. रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि मध्य रेल्वेसह अन्य मेट्रो मार्गिकांशी जोडणी अधिक सुलभ होईल. परिणामी, या संपूर्ण परिसरातील औद्योगिक, व्यावसायिक आणि नागरी विकासालाही नवी चालना मिळेल.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...