LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

जेएमएफ' शिक्षण संस्थेच्या वंदे मातरम् महाविद्यालय, डोंबिवली येथे मुंबई विद्यापीठाच्या ‘आविष्कार संशोधन अधिवेशन’चे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, नवोपक्रमशीलता, सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बौद्धिक गुणवत्ता विकसित करण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या, विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत ‘आविष्कार संशोधन अधिवेशन’ (Avishkar Research Convention) चे आयोजन गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी वंदे मातरम् कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, डोंबिवली येथे करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या संशोधन, नवोपक्रम, वैज्ञानिक दृष्टिकोन व सर्जनशीलतेला मिळणार व्यासपीठ

मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली आयोजित या प्रतिष्ठित संशोधन अधिवेशनात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि संशोधन क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. या अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांकडून विविध संशोधन प्रकल्प, अभिनव संकल्पना, वैज्ञानिक प्रयोग, नाविन्यपूर्ण कल्पना आणि संशोधनात्मक निष्कर्ष सादर करण्यात येणार आहेत.

युवा संशोधकांना त्यांच्या संशोधन कार्याचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व चिकित्सक विचारसरणी विकसित करणे हा या अधिवेशनाचा प्रमुख उद्देश आहे.

या अधिवेशनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधक, विद्वान, प्राध्यापक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधण्याची तसेच त्यांच्या संशोधन कार्याला मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी आणि सर्व ज्ञानप्रेमींनी उपस्थित राहून युवा संशोधकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जाह्नविज मल्टी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार एम. कोल्हे यांनी केले आहे.

हे संशोधन अधिवेशन सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, संशोधन, नवोपक्रम, ज्ञान आणि उत्कृष्टतेचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्रात संशोधन संस्कृतीला नवी दिशा आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यामधे १०० च्या वर ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, कर्जत, कसारा पर्यंत, मुरबाड, शहापूर महाविद्यालयाचा सहभाग असणार आहे.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...