LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

भाजप नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी सर केला ५,३६४ मीटरवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि रोवला एव्हरेस्टच्या कुशीत डोंबिवलीचा झेंडा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - वैद्यकीय सेवा आणि नगरसेविका म्हणून सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच डोंबिवलीतील भाजपच्या नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी साहसाची नवी उंची गाठली आहे. हिमालयातील प्रतिकूल हवामानावर मात करत त्यांनी ५,३६४ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पची यशस्वी चढाई केली आहे.

'माऊंटेनिअर्स असोसिएशन'च्या तिसऱ्या मोहिमे अंतर्गत २४ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ही मोहीम पार पडली. मोहिमेपूर्वी असोसिएशनचे अनुभवी प्रशिक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. हिमालयातील सतत बदलणारे हवामान, तेथील जीवनशैली, हिमवर्षावाच्या काळात घ्यावयाची खबरदारी आणि सुरक्षा साधनांचा योग्य वापर याबाबत सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

वैद्यकीय व्यवसायासोबतच नगरसेविका म्हणून प्रभागातील नागरिकांच्या समस्या, सामाजिक उपक्रम, विकासकामे तसेच महापालिकेच्या सभा आणि बैठकांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या डॉ. सुनीता पाटील यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत या साहसी मोहिमेत सहभाग घेतला. त्यांच्या या यशामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या मोहिमेत डॉ. सुनीता पाटील यांच्यासह देवदत्त दिगवडेकर, प्रतीक दिगवडेकर, मनीष खरात, ज्योती जोशी, माया दिगवडेकर, अभिजीत कुलकर्णी, राम गणपती, विश्वास जोशी, कैवल्य मोडक, सदानंद दांडेकर आणि पद्माकर गायकवाड सहभागी झाले होते.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...