LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

दिव्यात विनापरवानगी स्टॉलवर दंडात्मक कारवाई होणार; सार्वजनिक ठिकाणी, पदपथ व रस्त्यांवर फटाका स्टॉल्सवर बंदी - सहाय्यक आयुक्त

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा, दि. ४ नोव्हेंबर : ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर तसेच पदपथांवर अनधिकृतपणे फटाका स्टॉल्स उभारण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांची होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. नियमांचे उल्लंघन करून अनधिकृतपणे फटाका स्टॉल्स लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

फटाक्यांचे स्टॉल उभारण्यासाठी व्यावसायिकांना दिवा प्रभाग समिती, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस ठाणे या तिन्ही विभागांची पूर्वपरवानगी घेणे तसेच आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवणे बंधनकारक आहे. सर्व आवश्यक परवानग्या आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना पूर्ण केल्यानंतरच प्रशासनाने निश्चित केलेल्या अधिकृत जागेवर फटाका स्टॉल उभारता येणार आहे.

यासंदर्भात दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त प्रवीणकुमार फड यांनी स्पष्ट केले असून नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी रोखणे ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. विनापरवानगी अथवा धोकादायक ठिकाणी फटाका स्टॉल्स आढळल्यास तातडीने कारवाई करून संबंधित स्टॉलचे साहित्य जप्त करण्यात येईल. त्यामुळे फटाका विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, आवश्यक परवानग्या घ्याव्यात आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्रवीणकुमार फड यांनी स्पष्ट केले आहे.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...