LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

कडोंमपा 'ई' प्रभाग क्षेत्र सभापती चा पदभार ग्रहण शिवसेना नगरसेवक अर्जुन पाटील यांनी स्वीकारला..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - शिंदेसेनेचे नगरसेवक अर्जुन बाबू पाटील यांनी गुरुवार दि.१९ रोजी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या 'ई' प्रभाग समिती सभापती कार्यालयाचा पदभार स्वीकारला. शिवसेना पदाधिकारी व अनेक मान्यवरांनी अर्जुन पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सभापती पाटील म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे यांचे त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. 

मी सभापती पदभार स्विकारल्यानंतर सर्वात प्रमुख असलेली समस्या म्हणजे प्रभागातील पाणी नियोजन व पाणी कपात यावर संबंधित विभागाशी चर्चा करणार आहे. प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवणार व पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवला तो मी सार्थक करेन.
या कार्यक्रमात अर्जुन बाबू पाटील यांच्या सौभाग्यवती आणि त्यांचे चिरंजीव त्याचप्रमाणे 'ई' प्रभाग क्षेत्र अधिकारी, अभियंता तसेच कर्मचारी या सर्वांनी अर्जुन पाटील यांना त्यांच्या पुढील वाटचाली करीता भरभरून शुभेच्छा दिल्या.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...