LIVE भीतीविना सत्य, पक्षपातीविना न्याय!
विशेष घडामोडी
न्याय रणभूमी डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे! निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी दररोज भेट द्या... साप्ताहिक ई-पेपर PDF डाऊनलोड करण्यासाठी ई-पेपर मेनूवर क्लिक करा... नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्राचे विश्वासू व्यासपीठ!
न्याय रणभूमी डिजिटल

दिव्यात नगरसेवक शैलेश पाटील यांच्याकडून लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट, शेकडो महिलांना साड्यांचे वाटप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा, दि. १४ नोव्हेंबर - भाऊ- बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण असलेल्या भाऊबीजे निमित्त दिवा शिवसेना उपशहरप्रमुख तथा नगरसेवक शैलेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवारी भाऊबीजेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी दिव्यातील शेकडो महिलांनी आपल्या लाडक्या दादांना भाऊबीजेचे औक्षण करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

नगरसेवक शैलेश पाटील यांच्याकडून दरवर्षी रक्षाबंधन आणि भाऊबीजेचा सण महिलांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दोन्ही सणांची दिव्यातील महिला भगिनी आतुरतेने वाट पाहत असतात. भाऊबीजेच्या निमित्ताने कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक बहिणीचे औक्षण स्वीकारत शैलेश पाटील यांनी त्यांना साडी भेट देऊन भाऊबीजेची ओवाळणी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे शैलेश पाटील आणि दिव्यातील महिला भगिनी यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणींना दिलेली साडी भेट ही केवळ भेटवस्तू नसून भाऊ- बहिणीच्या प्रेमाचे आणि आपुलकीचे प्रतीक असल्याची भावना यावेळी महिलांमध्ये पाहायला मिळाली. या कार्यक्रमाला दिव्यातील शेकडो महिला भगिनींची उपस्थिती लाभली. आनंदी आणि उत्साही वातावरणात भाऊबीजेचा हा सोहळा संपन्न झाला.
जाहिरातीसाठी संपर्क
ताजा घडामोडी
बातम्या लोड होत आहेत... कृपया प्रतीक्षा करा...