पुणे : पुण्यातील 'इंडुकेअर फार्मास्युटिकल' कंपनीवर 'एफडीए' (FDA) कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कंपनीची ९ औषधं अप्रमाणित आणि बनावट असल्याचं समोर आलं आहे. एफडीए कडून कंपनीचा औषध उत्पादन परवाना रद्द करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयातून इंडुकेअरचा १.७२ कोटींचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. परवानगीशिवाय ९ औषधांचे उत्पादन आणि विक्री केल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. इंडुकेअरची सर्व ९ औषधं अप्रमाणित आणि बनावट असल्याचं उघड झालं आहे.
दरम्यान सप्टेंबर २०२६ मध्ये देखील २५ गंभीर त्रुटींमुळे ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’ कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला होता. आता ही दुसरी वेळ आहे. आता दुसऱ्यांदा ‘इंडुकेअर फार्मास्युटिकल’ कंपनीचा औषध उत्पादन परवाना पुन्हा एकदा रद्द करण्यात आला आहे.