BREAKING NEWS
latest

आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मॉरिशस मध्ये पायाभरणी करत महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूसाठी आठ कोटींचा निधी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये मैत्रीचे नाते पिढ्यान् पिढ्यांचे असून, सातासमुद्रापार राहूनही येथील मराठी जनसमुदायाने आपली सांस्कृतिक नाळ अतिशय अभिमानाने जपली आहे, असे गौरवोद्‌गार भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी मॉरिशस येथे काढले. मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा सोमवारी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र भवन वास्तूच्या विस्तारासाठी आठ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
आमदार चव्हाण यांनी त्यांच्या तीन दिवसीय मॉरिशस दौऱ्यात मान्यवरांच्या भेटीगाठी घेत, भारत-मॉरिशस संबंध अधिक दृढ केले. या दौऱ्यात आमदार चव्हाण यांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखुल यांच्या सरकारी निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत भारत-मॉरिशस मैत्री, ब्ल्यू इकॉनॉमी, पर्यटन, एआय आणि सायबर सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
"मॉरिशस हाभारताचा लहान भाऊ आहे," असे सांगत राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक केले, तसेच भारताने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर, मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री धनंजय रामफुल, आयटी व इनोव्हेशन मंत्री डॉ. अविनाश रामतोहूल आणि कला व सांस्कृतिकमंत्री महेंद्र गोंदीया यांच्यासोबत बैठका पार पडल्या.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत