BREAKING NEWS
latest

जाह्नवीज मल्टी फाउंडेशन संचालित 'जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर' चा डोळ्यांचे पारणे फेडणारा वार्षिक स्नेहसंमेलन ९ वा 'प्रेरणोत्सव २०२५' उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२१ : दरवर्षी सर्वच विद्यार्थी पालक ज्या गोष्टीची आतुरतेने व उत्सुकतेने वाट बघत असतात तो म्हणजे आपल्या पाल्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा. दरवर्षी प्रमाणेच या वर्षी देखील जन गण मन इंग्लिश शाळा चा १७ वा आणि विद्यामंदिर चा ९ वा वार्षिक स्नेहसंमेलन 'प्रेरणोत्सव २०२५' दिनांक २० व २१ जानेवारी  रोजी चार सत्रांमध्ये डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलादालनात पार पडला.
दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वच उपस्थितांना स्नेहसंमेलनाची मेजवानीच होती. सकाळी दहा ते एक या सत्रात जन गण मन किड्स प्ले, शिशु विहार ते इयत्ता  दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा नववा 'प्रेरणोत्सव २०२५' स्नेहसंमेलन पार पडला. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, प्रमुख पाहुणे श्री.माधव जोशी, राज योगिनी बी.के.शकू दिदिजी व इतर पदाधिकारी या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. 
चारही सत्रात राष्ट्रगीत झाल्यावर  विद्यार्थ्यांनी शालेय गीत व स्वागत गीत म्हणून पाहुण्यांचे स्वागत केले. तर इयत्ता दुसरी मधील कु. श्रावणी पवार हीने स्वागतपर भाषण केले. शिशु विहाराच्या उप-मुख्याध्यापिका सौ. मयुरी खोब्रागडे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. इंग्लिश सेकंडरी शाळे मधून शिशु विहाराच्या अनया सागरे, सारा योही, मोठा शिशु तसेच इयत्ता दुसरी मधील अर्णव अंबिके व श्रेयांश देसाई या विद्यार्थांना 'स्टार स्टुडंट्स ऑफ द इयर' (तारका विद्यार्थी) म्हणून मान्यवरांच्या हस्ते मुकुट परिधान करून गौरविण्यात आले. तसेच सीबीएसई मधून हेतल तांडेल(इयत्ता तिसरी), मीरा पाटील(इयत्ता पाचवी), ऋषाव दास(इयत्ता आठवी), दीक्षा गरदे(इयत्ता दहावी) यांनाही पुरस्कार देण्यात आले. विद्यामंदिर मधून विहान गांधी, सुप्रिया चौधरी, हर्शील परघी यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सर्व मान्यवरांनी विजेत्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांचा 'कार्टून कॅरेक्टर' (व्यंगचित्र चरित्र) या छोट्या मुलांच्या आवडीचा विषय घेऊन नृत्य, नाटिका सादर केल्या गेल्या. सर्वच मुले सिंचॅन, डोरेमाँन, छोटा भीम, टॉम आणि जेरी, मिकी माऊस, बार्बी, मोटू पतलू तसेच जंगल बुक चे प्राणी बनून वेष परिधान करून तयार होऊन आले होते. मुलांचे नृत्य आणि उत्साह बघुन त्यांचे पालक देखील मुलांप्रमाणेच लहान झाले होते. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामवी, चारवी, लिरिषा, यांनी केले तर आभार प्रदर्शन मायरा या विद्यार्थीनींने केले. दुपारच्या दोन ते पाच  सत्रात जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळेच्या चे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. 'द रिअल सुपर हिरो' हा विषय घेऊन नृत्य आणि नाटिका सादर झाल्या. शिशु विहार ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आपल्या रोजच्या जीवनातले आपले हिरो म्हणजे आई बाबा, डॉकटर, शिक्षक, भाजीवाले, डबेवाले, पोलीस आहेत. सर्व मुले दिलेल्या थीम नुसार वेष परिधान करून आली होती व या सर्व रियल लाईफ हिरोना आपल्या नृत्य नाटकातून कृतज्ञता व्यक्त केली, नर्सरी मधील विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या आई बाबांनाही नृत्य करण्याची संधी मिळाली. इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी 'स्वच्छ भारत' नाटिका सादर केली व स्वच्छतेचा संदेश दिला. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी, अविरा, सानवी या विद्यार्थिनींनी केले तर स्वागतपर भाषण देविका हीने केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आरूष भांगे या विद्यार्थ्याने केले.
संध्याकाळी सहा ते नऊ च्या सत्रात जन गण मन इंग्लिश शाळेचे इयत्ता तिसरी ते दहावी या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन पार पडले. 'इंक्रेडिबल आर्ट' (अविश्वसनीय, अतुल्य कला) हा विषय घेऊन नृत्य, नाटक, गायन, वादन सादर केले गेले. कार्यक्रमाची सुरुवात शिव तांडव ने करण्यात आली व त्यानंतर भारतातील अतुल्य कला सर्व मुलांनी आपल्या नृत्य, नाटक, गायन, वादनातून प्रेक्षकांना दाखविल्या. यामधे शास्त्रीय गायन, वादन, अभंग, सालासा नृत्य प्रकार, राजस्थानी कठ पुतली, सावित्रीबाई फुलेंचे नाटक, पथनाट्य, एकपात्री अभिनय अशा अनेक कलांचा समावेश होता व सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले.
दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दोन मधील सत्रात जन गण मन विद्यामंदिर, इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन पार पडले. भारत देश विविध संस्कृती कलांनी नटलेला आहे. 'सा कला या विमुक्तये' म्हणजेच कला ही सर्व बंधनातून मुक्त करते. स्वच्छंदी आनंदी राहण्यासाठी अंगी कला असणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या अंगी कला आणि नवरस असतात. जन गण मन विद्यामंदिर साठी 'नवरस ' हा विषय घेऊन विद्यार्थ्यांनी प्रत्येक नवरसाची  माहिती आपल्या नाटकात देऊन त्यावर नृत्य सादर केले. नवरसंपैकी अदभुत रस, भयानक रस अशा ह्या नृत्य नाटिका नी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. 
संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी दोन दिवसांचा 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा बघुन आज आपल्या सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असे उद्गार काढून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ज्या प्रमाणे कस्तुरी मृग कस्तुरीचा सुवास घेण्यासाठी पळत असते त्यावेळी त्या मृगालाच माहिती नसते की आपल्याच अंगात कस्तुरी आहे, अगदी या मुलांचे तसेच आहे त्यांच्या स्वतःच्या अंगात कलेचे दालन आहे आणि त्या दालनातील स्वतःच्या अंगीकृत कलेचा खजिना त्यांनाही आजच उमजला, प्रत्येक मुलाला परमेश्वराने विशेष घडवले आहे. दोन्ही दिवसाचा कार्यक्रम हा अवाक करणारा होता असे उदगार काढून सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी मुलांच्या अंगीकृत कलागुणांना वाव देऊन नव्या कल्पनेच्या अविष्कारांना व्यवसायाच्या दृष्टीने स्टार्टअप करिता भांडवल म्हणून 'ऑन द स्पॉट फंडिंग' करणारे जेके स्टार्टअप सपोर्ट इन्कयूबेशन सेंटर चे फाउंडर श्री. जयेश खाडे ही उपस्थित होते.
अगदी नर्सरी पासून ते दहावी पर्यंतच्या मुलांनी एका पेक्षा एक असे सादरीकरण करून सर्व पालकांना थक्क करून टाकले. आपल्या पाल्या मधे काय कमतरता आहे, याच्यापेक्षा त्याच्यामध्ये काय कलागुण आहेत आणि त्या कला गुणांना कशाप्रकारे प्रोत्साहित करता येईल याचा विचार पालकांनी करावा, प्रत्येक मूल हे वेगळे असते, त्याची स्वतःची एक खास शैली असते त्यामुळे कुणाशीही तुलना न करता आपल्या मुलाच्या अंगभूत कलेला वाव द्या, असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले. कलात्मक शिक्षक संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी, नृत्य शिक्षक अभिषेक देसाई, दिपाली सोलकर, नाट्य शिक्षक प्रमोद पगारे व समूह तसेच हस्तकला शिक्षिका दीपा तांबे, सपना यांनाम, स्नेहा डोळे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभून 'प्रेरणोत्सव २०२५' हा यशस्वीरित्या पार पडला. डॉ.निखिल शासने यांनी रोजच्या जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी योगा नृत्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. संगीत शिक्षिका सौ श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.

देशातील पहिली सोलर कार बाजारात दाखल..

प्रतिनिधी : अवधुत सावंत
   
पुणे : येथील स्टार्टअप कंपनी 'वेव मोबीलिटी' कडून ऑटो एक्सपोमध्ये भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार 'इवा' लाँच करण्यात आली आहे. वेव इवा ही एक छोटी कार आहे. ज्यामध्ये २ लोकं आणि एक लहान मूल बसू शकते. कंपनीचा दावा आहे की कार एका चार्जवर   २५०  किलोमीटरची रेंज देईल. ही ईवा ५ सेकंदात ०-४० किलोमीटर प्रतितास वेग वाढवू शकते. इवाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹३.२५ लाख आहे, ज्यामध्ये सबस्क्रिप्शन प्लॅन म्हणून बॅटरीचा समावेश आहे.

त्याच वेळी, शुक्रवारी आयएक्स१ एलडब्लूबी लाँच केल्यानंतर, जर्मन लक्झरी ऑटोमेकर बीएमडब्ल्यू ने दुसऱ्या दिवशी ४ लाँच केले आहेत. यामध्ये मिनी कूपर एस जेएसडब्लू पॅक आणि नवीन बीएमडब्ल्यू एक्स३ या दोन कार लाँच करण्यात आल्या आहेत. याशिवाय एस १००० आरआर आणि आर १३०० जीएसए एडव्हेंचर या दोन बाईक्स सादर करण्यात आल्या. विनफास्टने भारतीय बाजारपेठेसाठी त्यांच्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही व्हिएफ ६ आणि व्हिएफ ७ चे अनावरण केले आहे. दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये विमानाने प्रेरित डिझाईन आहे आणि त्यात केबिनसारखे कॉकपिट आहे. यात एज-टू-एज मूनरूफ देखील आहे.

याशिवाय, कंपनीने व्हिएफ ३, व्हिएफई३४, व्हिएफ८, व्हिएफ९ इलेक्ट्रिक एसयूव्ही, व्हिएफ वाईल्ड पिकअप ट्रक देखील प्रदर्शित केले आहेत. मात्र, या गाड्या भारतीय बाजारात दाखल होणार नाहीत. भारतासाठी सादर केलेल्या कार वर्षाच्या अखेरीस उपलब्ध होऊ शकतात.

आज (१८ जानेवारी) इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ चा दुसरा दिवस आहे. दिवसाची सुरुवात व्हिएतनामच्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी विनफास्टने केली. कंपनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत आहे. व्हिएतनामी कंपनी सध्या तीन खंडांमधील १२ देशांमध्ये कार्यरत आहे. आज एक ६ सीटर फ्लाइंग टॅक्सी देखील दाखल होणार आहे, जी सरला एव्हिएशनने बनवली आहे. त्याचबरोबर पहिली सोलर कार इवा ही सादर करण्यात येणार आहे. याशिवाय ह्युंडाई मोटर इंडिया, बी वाय डी, बी एम डब्लू इंडिया, बजाज ऑटोसारखे ब्रँड त्यांच्या वाहनांचे प्रदर्शन करणार आहेत.

एक्स्पोच्या पहिल्या दिवशी, मारुती-सुझुकीने पहिली इलेक्ट्रिक कार ई-विटारा सादर केली . त्याच वेळी, ह्युंडाई मोटर इंडियाने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार क्रेटा ईवी लाँच केली. यासह ऑटोमोबाईल कंपन्यांनी पहिल्या दिवशी ३०  हून अधिक वाहने सादर केली.

राज्य शिक्षण मंडळाकडून १० वी, १२ वीच्या हॉल तिकीटांवर जातप्रवर्गाचा उल्लेख..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी (एस एस सी) इयत्ता १० वी आणि (एच एस सी) इयत्ता १२ वी ची परीक्षा अगदी तोंडावर आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचं हॉल तिकीट शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मात्र हे हॉल तिकीट आता वादग्रस्त ठरत आहे. हॉल तिकीट पाहून एकच गोंधळ उडाला आहे. कारण विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर कास्ट कॅटेगरी (जात प्रवर्गाची श्रेणी) नमूद करण्यात आली आहे. हे पाहून शिक्षण तज्ज्ञ व शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे शिक्षण मंडळाला मोठ्या टिकेला सामोरं जावं लागत आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. गोसावी म्हणाले, “हॉल तिकिटांवर जात नव्हे तर जात प्रवर्गाचा उल्लेख आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा उल्लेख केला गेला आहे.

शरद गोसावी म्हणाले, “हॉल तिकिटांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख नाही तर जातप्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, म्हणजे ओबीसी, एसटी, एससी असा उल्लेख आहे. आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्या शिष्यवृत्ती घेताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांच्या हॉल तिकीटांवर जातप्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या जनरल रजिस्टरवर विद्यार्थ्याच्या जातीची, जातप्रवर्गाची नोंद असेल तर त्यांना शिष्यवृत्ती मिळवणं सोपं होतं. विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख फक्त दाखल्यावर असतो त्यात चूक झाली तर पुढील शिक्षणात अडचण येऊ शकते ते टाळण्यासाठी हॉल तिकींटावर प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे.

शरद गोसावी म्हणाले, शाळा सोडल्यानंतर शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या जनरल रजिस्टरमध्ये विद्यार्थ्याला त्याचं नाव, त्याच्या पालकांचे नाव, जात अथवा जात प्रवर्गात कुठलीही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून येत नाही. अनेकदा विद्यार्थ्यांच्या जातीचा अथवा प्रवर्गाचा उल्लेख चुकलेला असतो. त्यामुळे भविष्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक विद्यार्थी अशा तक्रारी घेऊन आमच्याकडे येतात. नियमानुसार विद्यार्थ्यांनी एकदा का शाळा सोडली की त्याला शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये त्याचं नाव, आडनाव, आई-वडिलांची नावे, जन्मतारीख किंवा जातीच्या उल्लेखात कोणताही बदल करता येत नाही. यात एखादी चूक असेल तर हे हॉल तिकीट त्यांच्या उपयोगी पडणार आहे. हॉल तिकिटावर एखादी चूक असेल तर ती आत्ताच निदर्शनास आणून देता येईल आणि दुरुस्त करून घेता येईल. या एकमेव उदात्त हेतूने राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जात प्रवर्गाची नोंद केली आहे. यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या नावातच काय इतर कोणत्याही गोष्टीत चूक असेल तर ती बदल करण्याची संधी मिळते.

शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ ३०० ते ५०० मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईतील एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीवर चर्चा झाली. या बैठकीत मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, तसेच मध्य, पश्चिम रेल्वे आणि महामुंबई मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईसाठी लोकल रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. एकत्रिक सेवा प्रणालीमुळे प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटी जलद तसेच सुलभ होणार असून, महसूल वाढीसह सार्वजनिक सेवांचा अधिकाधिक वापर होईल. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून टॅक्सी आणि इतर सेवांसोबत या प्रणालीचे एकत्रिकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकल्पामुळे प्रवाशांना सहजगत्या एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व वाहतूक सुविधा मिळतील. यामुळे वाहतुकीचे सुलभीकरण होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, तसेच वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस सांगितले.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मुंबईत सध्या ३,५०० लोकल सेवा कार्यरत आहेत. येत्या काळात आणखी ३०० लोकल सेवा सुरू करण्यासाठी १७,१०७  कोटी रुपयांची गुंतवणूक रेल्वेकडून करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांमध्ये १. ७० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकार शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली राबविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. महाराष्ट्र इंस्टीट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA)च्या नेतृत्वाखालील या उपक्रमाचे उद्दिष्ट विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट प्रक्रिया एकसंध तसेच सुलभ करणे आहे. यासाठी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) प्लॅटफॉर्मचा तांत्रिक आधार घेतला जाणार आहे.

डोंबिवलीत तरूणीचा पाठलाग करणाऱ्या इसमाला नागरिकांचा चोप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : मागील वर्षभर नोकरीवर जाणाऱ्या एका तरूणीचा पाठलाग करणाऱ्या एका इसमाला तरूणीने आरडाओरडा करताच नागरिकांनी रस्त्यावर पकडले. त्याला बेदम चोप देत पोलीसांच्या ताब्यात दिले. विष्णुनगर पोलीसांनी संबंधित नोकरदार तरूणीच्या तक्रारीवरून इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की नोकरदार तरूणी आपले आई, वडिल आणि कुटुंबीयांसह महात्मा फुले रस्ता भागातील गायकवाडवाडी भागात राहते. ही तरूणी डोंबिवलीत नोकरी करते. सकाळी ती रिक्षेतून कामाच्या ठिकाणी जाते. कामावरून सुटल्यावर पुन्हा रिक्षेतून घरी येते. मागील वर्षभराच्या कालावधीत तरूणी कार्यालयात जायला निघाली की एक इसम दुचाकीवरून येऊन या तरूणीला अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. या तरूणीला या तरूणाची भीती वाटायची. सतत हे प्रकार घडू लागल्याने तरूणीने घडत असलेला प्रकार आपल्या आई, वडिलांना सांगितला.

तरूणीने अनेक वेळा पाठलाग करणाऱ्या या इसमाला आपल्या वाट्याला जाऊ नकोस. मला तूझ्याशी कोणत्याही प्रकारचा संंवाद करायचा नाही, अशी तंबी दिली होती. तरीही इसम ऐकत नसल्याने एक दिवस तरूणीने वडिलांना सोबत ठेवले आणि ती कामावर जायला निघाली. नेहमीप्रमाणे इसम पुन्हा तरूणीचा पाठलाग करत आला. त्यावेळी तक्रारदार तरूणीच्या वडिलांनी त्या पाठलाग करणाऱ्या इसमाला रोखून आपल्या मुलीला कोणत्याही प्रकारचा आपण त्रास देऊ नये. तिचा पाठलाग करायचा नाही. हा प्रकार सुरू राहिला तर मात्र आम्ही तुझ्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू, असे सांगितले. या प्रकारानंतर काही दिवस इसम तरूणीचा पाठलाग करणे थांबला होता. अलीकडे पुन्हा संबंधित इसम तरूणीचा पाठलाग करून तिला रोखून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तरूणी त्याला झिडकारत होती. मंगळवारी तरूणी कामावरून सुटल्यावर घरी जाण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर रिक्षेची वाट पाहत होती. त्यावेळीही संबंधित इसम पुन्हा तरूणीजवळ दुचाकीवरून आला. हा इसम आपल्याशी काही गैरकृत्य किंवा आपल्या जिवाला काही दुखापत करण्याची भीती तरूणीला वाटू लागली. इसम तरूणीजवळून दूर होत नव्हता. यावेळी तरूणीने मोठ्याने आरडाओरडा करून दुचाकीवरील इसम आपल्याला त्रास देत आहे असे सांगितले. पादचाऱ्यांनी त्या तरूणीला त्रास का देतोस, असे प्रश्न करत त्या इसमाला भर रस्त्यात चोप दिला. घनश्याम गुप्ते छेद रस्त्यावर हा प्रकार घडला.

हा प्रकार तरूणीने आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर या इसमाविरुध्द तरुणीच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महात्मा फुले रोड परिसरात मागील अनेक वर्षापासून काही टवाळखोर, गुंडांची दहशत आहे. याच भागातील एका माँटी भाईला पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पत्रकारांना मारहाण प्रकरणी रस्त्यावर झोडपून काढले होते. याच भागातील हा इसम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ऍड.आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

उर्वरित जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची व सहपालकमंत्री पदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :

नागपूर व अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे,
अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे-पाटील,
वाशीम : हसन मुश्रीफ,
सांगली : चंद्रकांत पाटील,
नाशिक : गिरीश महाजन, 
पालघर : गणेश नाईक,
जळगाव : गुलाबराव पाटील,
यवतमाळ : संजय राठोड,
मुंबई उपनगर : ऍड.आशिष शेलार तर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा,
रत्नागिरी : उदय सामंत,
धुळे : जयकुमार रावल,
जालना : श्रीमती पंकजा मुंडे,
नांदेड : अतुल सावे, 
चंद्रपूर : डॉ.अशोक उईके,
सातारा : शंभूराज देसाई,
रायगड : कु.आदिती तटकरे,
लातूर : शिवेंद्रसिंह भोसले,
नंदुरबार : ऍड.माणिकराव कोकाटे,
सोलापूर : जयकुमार गोरे,
हिंगोली : नरहरी झिरवाळ,
भंडारा : संजय सावकारे,
छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट,
धाराशिव : प्रताप सरनाईक,
बुलढाणा : मकरंद जाधव (पाटील),
सिंधुदुर्ग : नितेश राणे,
अकोला : आकाश फुंडकर,
गोंदिया : बाबासाहेब पाटील,
कोल्हापूर : प्रकाश आबिटकर तर सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ,
वर्धा : डॉ.पंकज भोयर आणि 
परभणी : श्रीमती मेघना बोर्डीकर 

मंत्रिमंडळातील सदर मंत्र्याकडे पालकमंत्रीपदे देण्यात आली आहेत.

'जेएमएफ' शिक्षण संस्थेत थिंक टँक उत्साह आणि नवोपक्रमाने राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस साजरा..

प्रतिनिधी : अवधुत सावंत

डोंबिवली : दिनांक १६ जानेवारी  २०२५ रोजी, जेएमएफच्या वंदे मातरम पदवी महाविद्यालय कला, वाणिज्य आणि विज्ञान, डोंबिवली, जन गण मन स्कूल ऍण्ड ज्युनियर कॉलेज येथे, भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाशी संलग्न असलेल्या इन्क्युबेशन सेलद्वारे 'जेएमएफ थिंक टँक' या मेगा इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते.  जेएमएफ मधुबन बँक्वेट हॉल येथे, जेएमएफ मध्ये तळमजला  शैक्षणिक परिसर कार्यक्रमांची संकल्पना आणि दिग्दर्शन डॉ. राजकुमार कोल्हे, 'जान्ह्विस मल्टी फाऊंडेशन'चे मानद अध्यक्ष आणि 'जान्ह्विस मल्टी फाऊंडेशन'चे मानद सचिव डॉ. प्रेरणा आर. कोल्हे यांनी केले होते ज्यांनी नाविन्यपूर्णतेचा एक मापदंड सेट केला. या कार्यक्रमात नवोदित उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि यशाचे प्रदर्शन करण्यात आले. वंदे मातरम पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.नाडर यांच्या उपस्थितीने या सोहळ्याचे महत्त्व अधिकच वाढले.

 बहुप्रतीक्षित 'जेएमएफ थिंक टँक' इव्हेंटद्वारे सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्णतेची लाट दाखवत, जेएमएफ कुटुंबाने यावर्षीचा राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस अतुलनीय उत्साहाने साजरा केला. ४० विद्यार्थ्यांनी वैयक्तिकरित्या आणि सांघिकपणे २८ कल्पना मांडल्या. सायबर सुरक्षा, फळांचे जतन, हरवले आणि सापडले, एआय ऑटोमेशन, रोबोटिक आर्म, इको फ्रेंडली मॉस्किटो मिस्ट, इको-फ्रेंडली पॅकेजिंगसाठी बायोप्लास्टिक्स, ग्रीनर फ्युचरसाठी शाश्वत पर्याय, सोलार किरण, स्पेस डेब्रिज कलेक्शन ड्रोन, ऑटोमेटेड ग्रीनहाऊस सिस्टम, या कल्पनांचा समावेश आहे.  इको-फ्रेंडली आधारित उत्पादने, इको फ्रेंडली फार्महाऊस, मच्छर  धुके, स्पेस डेब्रिज कलेक्शन ड्रोन, ग्रास पेपर प्रोडक्ट, पारंपारिक लाकडावर आधारित कागदाचा शाश्वत पर्याय, कस्टम टी-शर्ट, नैसर्गिक धूप बत्ती आणि वेदनारहित मधुमेह शोध. २८० हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांच्या श्रोत्यांसह हा दिवस कल्पकता आणि प्रेरणा देणारा ठरला.
या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे श्री. जयेश खाडे, मार्गदर्शक, ई-सेल, आयआयटी बॉम्बे यांची उपस्थिती होती, जे सामायिक केलेल्या कल्पनांच्या वेगळेपणाने आणि तेजाने प्रभावित झाले. "प्रेझेंटेशन कल्पनेच्या पलीकडचे होते. जेएमएफ फॅमिली आश्चर्यकारक साध्य करण्यासाठी नशिबात आहे," त्यांनी या नाविन्यपूर्ण उपायांच्या संभाव्यतेबद्दल उत्साह व्यक्त करत टिप्पणी केली. श्रीमती शेर्ली पॉल, शेठ माधवदास आमर्से हायस्कूल, अंधेरीच्या प्राचार्या देखील अतिथी म्हणून उपस्थित होत्या.  त्या म्हणाल्या की हा कार्यक्रम अद्वितीय आहे आणि त्याच प्रकारचे क्वचितच आयोजन केले जाते आणि विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या कल्पना मुलांच्या सर्जनशीलतेच्या मर्यादेच्या पलीकडे असतात आणि तरुण पिढीसाठी प्रासंगिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानले.

जन गण मन शाळेतील ८ वीचा विद्यार्थी हर्षिल पारघी याला स्टार्टअप ॲम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आले, ज्याने लहानपणापासूनच प्रतिभेचे संगोपन करण्यावर या कार्यक्रमाचे लक्ष केंद्रित केले आहे. या कार्यक्रमाने संशोधक आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या अग्रगण्य कल्पना प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले, ज्यांना त्यांच्या सर्जनशीलता, व्यवहार्यता आणि प्रभावासाठी व्यापक प्रशंसा मिळाली. उत्साही सहभाग आणि अनोख्या संकल्पनांनी 'जेएमएफ' समुदायाची उद्योजकता अधोरेखित केली.

 समर्पित मार्गदर्शक व मार्गदर्शक श्री.आमोद वैद्य, जेजीएम विद्यामंदिरचे प्रभारी प्राचार्य श्री. ज्योती व्यंकटरमण, जेजीएम इंग्रजी माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्री. अल्पेश खोब्रागडे, जेजीएम  ज्युनियर कॉलेजचे प्रभारी मुख्याध्यापक, यांचे विशेष आभार मानले.  जेजीएमचे उपप्राचार्य तेजावती कोटियन, इनक्युबेशन सेलच्या संचालिका अमृता सिंग, डॉ. ब्रिजेश गौड आणि श्रीमती माधुरी भांगे, सेलच्या सदस्यांसह इतर मार्गदर्शक शिक्षक, त्यांच्या अतूट बांधिलकीने कार्यक्रमाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.  त्यांच्या कौशल्याने आणि प्रोत्साहनाने विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण मानसिकतेचे पोषण केले नाही तर त्यांना उद्योजकता आणि संशोधनासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण कौशल्यांनी सुसज्ज केले. इनोव्हेशनचे भविष्य तयार करणे जेएमएफ थिंक टँकमध्ये सादर केलेल्या कल्पनांमुळे जेएमएफ इनक्युबेशन सेल अंतर्गत भविष्यातील यशाचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा आहे.  

या इव्हेंटने एक गतिमान आणि अग्रेषित विचार करणाऱ्या परिसंस्थेचा टोन सेट केला आहे, जो बॉक्सच्या बाहेरच्या विचारांना चालना देतो आणि आधुनिक उद्योजक जगाच्या आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना तयार करतो. राष्ट्रीय स्टार्ट-अप डे सेलिब्रेशनला उत्कृष्ट यश मिळवून दिल्याबद्दल 'जेएमएफ' कुटुंब सर्व सहभागी संशोधक, विद्यार्थी आणि योगदानकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते.  आज प्रदर्शित होणारी उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्ण भावना निःसंशयपणे पुढील वर्षांमध्ये अभूतपूर्व उपक्रम आणि यशांना प्रेरणा देईल.