BREAKING NEWS
latest

"फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं." - ह.भ.प चारुदत्त आफळे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : आज उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मंत्र, वेद, विद्या, संध्या, स्तोत्र, यांचं काय करायचंय असा संभ्रम आहे. आज सर्वत्र पर्यावरण प्रदूषण यावर विचार केला जातो. शुद्ध उच्चार विचार व आचार उत्कृष्ट मंत्रोच्चाराने वातावरणाची शुद्धी होते, हे शास्त्रज्ञांनीही मान्य केलं आहे. आपल्या पूर्वजांनी पुढच्या पिढ्यांसाठी निरोगी आयुष्यासाठी संस्कार रुपी ऑक्सिजन प्लांट दिला आहे. आयटीत रहा पण ऐटीत राहताना आपल्या संस्कृतीचा विसर नसावा, कारण फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं. असे परखड मत ह.भ.प श्री.चारुदत्त आफळे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले.
रविवारी २ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीच्या टिळक नगर शाळेच्या प्रांगणात ब्राह्मण संमेलनाचे आयोजन ब्राह्मण महासंघाने केले होते. त्यावेळी श्री.चारुदत्त आफळे उपस्थितना मार्गदर्शन करत होते. "आज सर्वत्र शुद्ध उच्चार - आचार व विचारांची आवश्यकता आहे, त्या आधारावरच आपण सत्ताधीश नाही पण किंगमेकर झालो आहोत. भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख ही आपल्या ज्ञातीचे आहेत हे अभिमानास्पदच आहे." असे परखड मत ह.भ.प श्री.चारुदत्त बुवा आफळे. यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
"पुरावे नसताना जाती, धर्म, व्यक्तींबद्दल मानहानी करणाऱ्यां विरुद्ध राज्य शासनानेच कठोर शासन करण्याची भूमिका घ्यावी म्हणजे कोणाचाही अपमान न होता सर्वच राष्ट्रपुरुष, सन्माननीय व्यक्ती व सामान्यांचाही मान राखला जाईल, अशी जनहिताची व सर्व समावेशक भूमिका घेणे ही काळाची गरज आहे" अशी सूचना राज्य सरकारला डोंबिवली ब्राह्मण महासंघाने करावी असे श्री.आफळे बुवा यांनी सांगितल्यावर डोंबिवली ब्राह्मण महासंघाने तसा ठराव करून मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे ठरले आहे. यावेळी ज्ञातीतील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचे पुरस्कार देऊन सत्कारही ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आले.
कवी किरण फाटक व साथीदार यांनी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष मानस पिंगळे, अनघा बोंद्रे, अनिकेत घमंडी, निलेश विरकर, जयंत कुलकर्णी, उल्हास दाते तसेच श्री. माधव घुले, श्री.सुरेश पिंगळे, श्री.राहुल दामले व श्री.मंदार हळबे आदी मान्यवर संमेलनास उपस्थित होते.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये ऑपरेशन बजेट २०२५-२०२६ च्या सेमिनारचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०३ : 'जाह्णवीज मल्टी फाउंडेशन' संस्थेचे वंदे मातरम डिग्री महाविद्यालय डोंबिवली पश्चिम येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार कोल्हे यांनी 'ऑपेरेशन बजेट २०२५-२०२६' या विषयावर कार्यशाळेचे आज दि. ०३/०२/२०२५ सोमवार रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थेच्या मधुबन हॉल येथे आयोजन केले होते. 
१ फेब्रुवारी २०२५ रोजी सन्मा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या २०२५-२६ च्या बजेटवर चर्चासत्र आणि माहिती देण्यासाठी एका सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या बऱ्याच वर्षापासून १ फेब्रुवारी रोजी देशाचा बजेट सादर करण्यात येते यात इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली बजेट सादर करण्याची वेळ का बदलण्यात आली याची माहिती देण्यात आली. या सेमिनारमध्ये डॉ. राजकुमार कोल्हे यांनी 'ज्ञान' (GYAN) म्हणजेच Garib, Youth, Annadata & Nari अशा गोष्टींचा उहापोह केला. बजेट मध्ये उल्लेख केलेल्या सर्व गोष्टीचा समावेश करण्यात आला. देशाची अर्थ व्यवस्था कशी मजबूत करता येईल आणि दवशाचा 'जीडीपी' (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) कसा वाढेल याकडे लक्ष देण्यात आल्याचेही सांगितले. आयकर भरण्यामध्ये आपला देश तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगत इतर विकसित देशामध्ये असलेली अर्थ व्यवस्था कशी मजबूत आहे याचाही विचार मांडण्यात आला. अनेक विषयावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या विचारलेल्या प्रश्नांचे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी समाधान केले. 
सदर सेमिनारसाठी शाळेतील  शिक्षक आणि विद्यार्थी अशा एकूण ३०० जणांचा सहभाग होता. सदरच्या सेमिनार मुळे विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षक वर्ग यांच्या ज्ञानामध्ये बजेट संबंधी भर पडली. या कार्यशाळेत संस्थेच्या सचिव डॉ. सौ. प्रेरणा राजकुमार कोल्हे, संस्थेच्या खजिनदार जाह्णवी कोल्हे ह्याही उपस्थित होत्या. तासाभराच्या सेमिनार नंतर वंदे मातरम ने या कार्यशाळेची सांगता झाली.