BREAKING NEWS
latest

जोगेश्वरीत गुन्हेगारी वाढतेय, प्रशासन झोपेत? – आमदार अनंत (बाळा) नर यांचा सरकारवर प्रहार

संदिप कसालकर

मुंबई : राज्यात कायदा-सुव्यवस्थेची वाताहत झाली असून सरकार अपयशी ठरले आहे, असा घणाघात जोगेश्वरी पूर्वचे आमदार अनंत (बाळा) नर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात केला.
महत्वाचे मुद्दे:
🔹 संघटित गुन्हेगारी, खंडणी, बलात्कार, हत्या, भ्रष्टाचार वाढतोय, पण सरकार शांत!
🔹 जोगेश्वरीत १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपी अजूनही फरार.
🔹 सत्यम इंडस्ट्रीजचे मालकांचा दिवसाढवळ्या निर्घृण खून, पण अद्याप ठोस कारवाई नाही.
🔹 शासकीय विभागांत भ्रष्टाचाराचा उच्चांक, जबाबदार अधिकारी कुठे आहेत?
🔹 बांद्रेकरवाडी आणि गरीब नवाज सोसायटी पुनर्वसन प्रकल्पातील रहिवासी अडचणीत.
🔹 मुंबईतील सरकारी जमिनी असुरक्षित, बिल्डर लॉबीला मोकळे रान का?
🔹 म्हाडा कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेबाबत सरकार गंभीर आहे का?

https://youtu.be/CPtyvEjFOH0?si=PBlnnUwsQBmLmWJ5

आमदार अनंत (बाळा) नर यांनी सरकारला थेट सवाल केला – "खून, बलात्कार, चोरी यांसारखे गुन्हे होईपर्यंत पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेणार का?"

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार कोणती पावले उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसैनिक आक्रमक! कुणाल कामराच्या वक्तव्यावर संताप – मेघवाड़ी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल!


संदिप कसालकर

​शिवसेना पक्षाच्या मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या आरोपावरून कुमार कामरा यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात  खासदार रवींद्र वायकर यांच्या निर्देशानुसार १५८ जोगेश्वरी पूर्व विधानसभा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत, महिला विभाग प्रमुख प्रियांका आंबोळकर, मनीषा रवींद्र वायकर, माजी नगरसेवक प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने २४ मार्च २०२५ रोजी मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले.​

या निवेदनात, कुमार कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात गैरसमज आणि तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.​

निवेदन सादर करताना शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये वरिष्ठ पदाधिकारी मिलिंद कापडे, अशोक धामापूरकर, विशाल धुरी, मिलिंद शिंगरे, धीरज परब, स्वप्नील सुर्वे, जनार्दन गालपगारे, संतोष भोसले, प्रकाश पावसकर, विनायक यादव, अमोल पारधी, सुरेंद्र कुंभार, वामन जगताप, व्यापार विभाग अध्यक्ष शैलेश जयस्वाल, शाखा प्रमुख प्रकाश शिंदे, हुसेन करोडी, बाळकृष्ण जोशी, उपेश सावंत, कार्यकर्ते विलास साळवी, राकेश आकुनुरी, प्रकाश साळवी, दिगंबर मांजरेकर, राजेश क्षीरसागर, प्रकाश लोखंडे आणि इतर शिवसैनिकांचा समावेश होता.​

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, जर संबंधित व्यक्तीविरुद्ध लवकरात लवकर कठोर कारवाई झाली नाही, तर शिवसैनिक आंदोलन छेडतील. या प्रकरणामुळे जोगेश्वरी पूर्व भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, आणि स्थानिक नागरिक या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.​

शिवसेना कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊन हा निषेध नोंदवला आहे. या घटनेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे, आणि ते आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ ठामपणे उभे आहेत.​

पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, अशी शिवसेना पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. 



पंतप्रधान मोदींनी दिली संमती! दिल्लीत पहिल्यांदाच कोकण हापूस महोत्सव

संदिप कसालकर 
दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये आंबा महोत्सव; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीला हिरवा कंदील

खासदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून ३० एप्रिल व १ मे रोजी आयोजन

दिल्लीकरांना थेट कोकणातील हापूस आंब्याची चव चाखण्याची संधी

सांस्कृतिक कार्यक्रमांसह कोकणातील शेतकऱ्यांसाठी नवीन बाजारपेठ निर्माण होणार

नवी दिल्ली : कोकणातील सुप्रसिद्ध देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याला अधिक बाजारपेठ मिळावी आणि दिल्लीकरांना त्याचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे ३० एप्रिल आणि १ मे रोजी "आंबा महोत्सव" आयोजित केला जाणार आहे. खासदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाला मूर्त स्वरूप मिळत आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तत्वतः संमती दिली आहे.
कोकणचा राजा हापूस थेट दिल्लीत
कोकणातील हापूस आंबा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. मात्र, थेट विक्रीव्यवस्थेच्या अभावामुळे शेतकऱ्यांना त्याचा पुरेसा लाभ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन खासदार वायकर यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे दोन दिवसांच्या आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या महोत्सवात दिल्लीकरांना थेट शेतकऱ्यांकडून हापूस आंबा खरेदी करता येणार आहे. तसेच, सांस्कृतिक कार्यक्रम, कोकणी खाद्यपदार्थ आणि पारंपरिक कलांचे सादरीकरण देखील होणार आहे.

पंतप्रधान मोदींसोबत चर्चा; विविध मागण्या मांडल्या
या महोत्सवाच्या निमित्ताने खासदार रविंद्र वायकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले. शेतीमालाला मोठ्या बाजारपेठा मिळाव्यात यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे पंतप्रधानांनी या चर्चेदरम्यान सुचवले.
याच भेटीत खासदार वायकर यांनी मुंबईतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गारगाई-पिंजाळ प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावर पंतप्रधानांनी जलसंधारण आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगला अधिक महत्त्व देण्याची सूचना केली.
तसेच, मुंबईत एम्सच्या धर्तीवर अत्याधुनिक रुग्णालय सुरू करून कर्करोग उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी खासदार वायकर यांनी केली. यावर पंतप्रधान मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
आंबा महोत्सवाचा उद्देश केवळ हापूसचा प्रचार करणे हा नसून, शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळवून देणे हा मुख्य हेतू आहे.
या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध राज्यांतील खासदार, आमदार आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांना मोठ्या बाजारपेठेचे दरवाजे खुला करण्याची संधी मिळणार आहे.

दिल्लीकरांसाठी खास कोकणी स्वाद
या महोत्सवामुळे दिल्लीतील नागरिकांना थेट शेतकऱ्यांकडून अस्सल हापूस आंबा खरेदी करण्याची संधी मिळेल. याशिवाय, कोकणातील पारंपरिक चव आणि सांस्कृतिक वारशाची अनुभूती देखील या महोत्सवाच्या माध्यमातून घेता येणार आहे.