BREAKING NEWS
latest

पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी,संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
“मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर”

मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे. या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे.
    
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ ९३७२३३८८२७ / ७३०४६७३१०५  या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी.
त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी २४x७ मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे.
    
या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:
दूरध्वनी क्रमांक:
०१९४-२४८३६५१
०१९४-२४५७५४३
व्हॉट्सॲप क्रमांक:
७७८०८०५१४४
७७८०९३८३९७
अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Central Press Journalist Association का अलर्ट! PM को भेजे सुझाव – देश को चाहिए 'ड्रोन+AI+क़ानून' वाला सुरक्षा कवच

जम्मू-कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले में 26 निर्दोष नागरिकों की मौत कोई साधारण घटना नहीं, बल्कि देश की आंतरिक सुरक्षा में बड़ी खामी का सबूत है। हर बार की तरह राजनैतिक दलों द्वारा बयान, ट्वीट, मोर्चा और विरोध – अब ये सब आम जनता को बोझिल और रटे-रटाए लगने लगे हैं। देश पूछ रहा है —

“हमला हुआ, विरोध हुआ… फिर आगे क्या?”

अब राजनीति नहीं, एक्शन चाहिए – ये 6 तकनीकी फैसले ज़रूरी हैं:

  1. AI आधारित रियल-टाइम इंटेलिजेंस सिस्टम लागू करें:
    जम्मू-कश्मीर जैसे संवेदनशील इलाकों में AI तकनीक से संदिग्ध गतिविधियों की पूर्व चेतावनी देने वाली प्रणाली तुरंत शुरू होनी चाहिए।

  2. सैटेलाइट और ड्रोन निगरानी नेटवर्क मजबूत करें:
    एलओसी के नज़दीकी इलाकों में 24x7 ड्रोन और उपग्रह मॉनिटरिंग सुनिश्चित की जाए। किसी भी घुसपैठ की जानकारी तत्काल मिले और फोर्स तुरंत सक्रिय हो।

  3. क्विक रिस्पॉन्स कॉम्बैट यूनिट (QRCU) की स्थापना:
    हमले के कुछ घंटों के भीतर ही आतंकियों को खत्म करने वाली तेज़तर्रार विशेष फोर्स तैयार की जाए।

  4. साइबर निगरानी प्रणाली का विस्तार:
    सोशल मीडिया के ज़रिए भटकने वाले स्थानीय युवाओं पर नज़र रखने के लिए हर राज्य में 24x7 साइबर ट्रैकिंग यूनिट की ज़रूरत है।

  5. राजनीतिक जवाबदेही तय होनी चाहिए:
    कोई भी नेता अगर देशविरोधी ताकतों को बढ़ावा देने वाला बयान देता है तो उस पर संसदीय जांच और कानूनी प्रक्रिया शुरू होनी चाहिए।

  6. स्थानीय नागरिकों से जुड़ा 'सिविक इंटेलिजेंस नेटवर्क':
    ज़मीनी स्तर पर संवाद बनाए रखने वाले प्रशिक्षित स्वयंसेवकों के ज़रिए आतंकी गतिविधियों की जानकारी पहले ही मिल सकती है।

"सर्वदलीय बैठक नहीं, अब सर्वदलीय एक्शन चाहिए!"

हमारा देश सिर्फ भावनाओं से नहीं, डेटा, टेक्नोलॉजी और रणनीति से सुरक्षित रहेगा। हर बार "जवाब दिया जाएगा" वाला बयान अब लोगों को खोखला लगने लगा है।

एक ही मांग —
राजनीति बंद करें, सुरक्षा पर ठोस सर्वदलीय कार्रवाई शुरू करें। वरना हर विरोध के पीछे अगला हमला तैयार खड़ा रहेगा।

महत्वपूर्ण सूचना:
यह विश्लेषण और सुझावों वाला पत्र प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को सेन्ट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन द्वारा सादर प्रेषित किया गया है ताकि केंद्र सरकार समय रहते इन सिफारिशों पर संज्ञान लेकर ठोस कदम उठा सके।




जोगेश्वरीत उफाळला संताप! पहलगाम हल्ल्यावर तांडव — 'फाशी द्या'च्या गगनभेदी घोषणा!


जोगेश्वरीत संतापाचा उद्रेक! पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध — देशद्रोहींचा कायमचा नायनाट करा!


आंदोलन पाहण्यासाठी येथे क्लिक करा


१५८ जोगेश्वरी पूर्व विधानसभा विभाग क्रमांक ४ तर्फे मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली आणि निषेध आंदोलन

मुंबई | २३ एप्रिल २०२५ : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, त्याच पार्श्वभूमीवर जोगेश्वरी पूर्वेत आज सायंकाळी ५.३० वाजता एकजुटीने निषेध नोंदवण्यात आला. हा कार्यक्रम १५८ जोगेश्वरी पूर्व विधानसभा विभाग क्रमांक ४ तर्फे खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जोगेश्वरी पूर्व रेल्वे स्टेशनजवळ आयोजित करण्यात आला होता.

विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत व महिला विभाग प्रमुख प्रियांका आंबोळकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला. या वेळी शाखाप्रमुख, शाखा संघटिका, शिवसैनिक, युवा सेना, अल्पसंख्यांक व्यापारी विभाग, उत्तर भारतीय मंच, अनुसूचित जाती अंगीकृत संघटना यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मेणबत्त्या पेटवून पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. नंतर उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत दहशतवाद्यांच्या या अमानुष कृत्याचा निषेध केला.

"दहशतवादी आणि त्यांच्या मदतीला धावणाऱ्या देशद्रोहींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही केवळ श्रद्धांजली नव्हे, तर संपूर्ण देशातील जनतेचा संताप आहे!"
अशा जोरदार भावना ज्ञानेश्वर सावंत यांनी व्यक्त केल्या.

प्रियांका आंबोळकर यांनी आपल्या भाषणात म्हटलं,
"आज देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या शक्तींना उत्तर देण्यासाठी आपण एकवटले पाहिजे. महिलांसाठी सुरक्षित भारत ही आपली जबाबदारी आहे."

कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व उपस्थितांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली –
"दहशतवाद्यांना फाशी द्या!"
"देशद्रोहींचा कायमचा नायनाट करा!"
"भारत माता की जय!"