BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' च्या जन गण मन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : परीक्षांमध्ये मिळवलेले गुण ही विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध करते. नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक परीक्षांच्या निकालामध्ये 'जन गण मन' कनिष्ठ महाविद्यालयातील सर्वच मुलांना उत्कृष्ट गुण मिळाले. त्यामध्ये विशेष दहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून जन गण मन कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव उच्च स्तरावर नेऊन ठेवले.
   
सानवी वालणकर, एंजल उपाध्ये, इलियास खान, तेजल पवार, आलोक मौर्या, रितिका भट, खुशी चौहान, अनुष्का कवडीआ, प्रियांशु गिरप, सिद्धेश जाधव या सर्व विद्यार्थ्यांनी अनुक्रमे ७५ ते ९० टक्के गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ह्या सर्व दहा विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व कौतुक केले. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच शिक्षणाचा पाया रोवला जातो, त्यामधे सातत्य, खेळ, हसत खेळत अभ्यास अशा गोष्टींचा चढता उतरता क्रम असतो व शेवटी बारावी सारख्या महत्वाच्या टप्प्यावर करिअर निवडण्याची संधी आणि वेळ येते, अशा वेळी योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य ते क्षेत्र निवडा असा सल्ला संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्व उत्तीर्ण व उत्कृष्ट गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिला.
   
लहानपणापासूनचे आपले मित्र हे ध्येय ठरवण्यापर्यंत आपल्याबरोबर असतात, परंतु नंतर सर्वांचे मार्ग प्रत्येकाच्या ठरवलेल्या वेगळ्या ध्येयानंतर विभक्त होतात, वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक अशा अनेक क्षेत्रा मध्ये आपण आपले करिअर करू शकता असे सांगून सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. पुन्हा एकदा सर्व उत्तीर्ण, घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

संपादक नव्हे, बलात्कारी! पत्रकारितेच्या नावावर केला महिलेशी अश्लील खेळ

संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

अभद्र संपादकाचा असली चेहरा! पत्रकारितेच्या मुखवट्याआड लपलेला बलात्कारी अंबादास भालेराव उघड झाला!

ठाणे (कल्याण) | न्यायाच्या आसऱ्याने पत्रकार संघटनेत काम करणाऱ्या एका महिलेवर संपादक असल्याचा दावा करणाऱ्या अंबादास भालेराव या नराधमाने वर्षानुवर्षे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महिला पत्रकाराच्या आयुष्याचा खेळ करून, तिचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत बलात्कार करत राहिला आणि ५ लाख रुपये उकळले.


घटनेचे तपशील – विश्वासघात, जबरदस्ती आणि ब्लॅकमेलचा भयाण खेळ!

  • पीडित महिला 2018 मध्ये श्रमीक पत्रकार संघटनेत महिला संघटक म्हणून काम करत होती.

  • अंबादास भालेराव हा तिला भेटला आणि आपण न्यूज चॅनलचा संपादक असल्याचे सांगितले.

  • "तू चांगले काम करतेस, माझ्यासोबत जॉईन हो" असं म्हणत जवळीक वाढवली.

  • तिचा विश्वास संपादन करून तिला 2019 मध्ये घरी जाऊन बलात्कार केला.

  • या घटनेचे व्हिडिओ शूट करून “तुझ्या नवऱ्याला सांगितलंस तर व्हायरल करीन” अशी धमकी दिली.

  • नंतर कल्याणमधील आदित्य हॉटेल, साईदीप हॉटेल याठिकाणी तिला नेऊन वेळोवेळी जबरदस्ती केली.

  • या सर्व काळात एकूण ५,००,००० रुपये रोख स्वरूपात उकळले.

  • 2024 मध्ये पीडित महिलेने त्याच्याशी संबंध तोडले.

  • तरीही भालेराव हा तिला वारंवार संपर्क करून पुन्हा संबंध ठेवण्याचा दबाव टाकू लागला.


कायदेशीर तक्रार दाखल!

  • FIR नं: 0331/2025

  • पोलीस ठाणे: टिळकनगर, ठाणे शहर

  • भारतीय न्याय संहिता अंतर्गत अंतर्गत गंभीर कलमे –

    • कलम 64(1): जबरदस्तीचा लैंगिक संबंध

    • कलम 351(2): शारीरिक छळ व धमकी

    • कलम 115(2): आर्थिक फसवणूक व ब्लॅकमेलिंग


“मी नरक अनुभवले... आता न्यायाची आशा आहे” – पीडितेचा हुंदका!

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'कार्य जीवन संतुलन' या विषयावर परिसंवादाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : काम आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल कसा साधावा ही सुद्धा एक कला आहे. 'जे एम एफ' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी 'काम जीवन आणि  संतुलन' यांचा ताळमेळ कसा बसवावा यासाठी मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये ५०० सदस्यांच्या उपस्थितीत परिसंवादाचे ३० एप्रिल २०२५ रोजी आयोजन केले. रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष होते व त्याचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर होतो व त्यामुळे राहणीमानाचा समतोल बिघडतो तर यासाठी काय करायला पाहिजे याच्या अत्यंत महत्वाच्या टिप्पणी संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले.
संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी सरस्वती पूजन करून परिसंवादाला सुरुवात झाली. जसे काम हीच पूजा आहे तसेच घर एक मंदिर आहे व त्या घरातील सदस्य हे एकीचे बळ आहे, डॉ. राजकुमार कोल्हे यांनी अशी सुरुवात करून मुख्य विषयाकडे वळले. प्रत्येकाकडे अंगभूत कला कौशल्य असते, आणि प्रत्येक जण ते कला कौशल्य पणाला लावून झोकून देऊन कार्यरत असतो अशा वेळी स्वतःकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यासाठी ध्यानधारणा, योगा, व्यायाम करून स्वतःला आणि मनाला तंदुरुस्त ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाचे कौशल्य हे वेगळे आहे याबद्दल सांगताना डॉ. राजकुमार कोल्हे यांनी डॉक्टर आणि इंजिनिअर यांचे चपखल उदाहरण दिले. दोघेही आपापल्या कौशल्यामधे पारंगत आहेत परंतु डॉक्टर हा चालू स्थितीतले उपकरण दुरुस्त करून जीवनदान देतो, तर इंजिनिअर किंवा मेकॅनिक हा बंद स्थितीतले उपकरण दुरुस्त करून चालू करतो हाच मोठा फरक आहे की मानवाला जीवनदान देण्याचे कार्य हे डॉक्टर चे आहे तर बंद पडलेले उपकरण चालू करण्याचे काम हे इंजिनिअर चे आहे आणि एकच कला दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी बुद्धिमत्तेने हाताळणे ही सुद्धा कला आणि विश्वास आहे असे वक्ते डॉ राजकुमार कोल्हे यांनी सांगितले.
अगणित कार्य करून नाव पैसे कमावले तरी स्वास्थ्य ढळू देऊ नका, कार्य आणि जीवनाचा समतोल राखण्यासाठी दिवसातले काही तास कामासाठी आणि स्वतःसाठी ठरवून द्या. मुंबईसारख्या कामाच्या धावपळीच्या जगात मनुष्य कुठेतरी हरवला आहे की त्याचे वैयक्तिक जीवन एखाद्या मशीन प्रमाणे झाले आहे. मोठमोठे समाजसेवक, देशसेवक, यांनी स्वतःला सेवेसाठी झोकून दिले परंतु त्याचवेळी वैयक्तिक आयुष्याचा ही समतोल साधला जावा यासाठी माजी राष्ट्रपती व माजी शिक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे उत्तम उदाहरण दिले.
नोकरीमध्ये समाधान असेल तरच व्यक्ती जीवनात समाधानी राहू शकतो तर जीवनात समाधानी असेल तरच नोकरीमध्ये प्रगती करू शकतो अशी सांगड घालता आली पाहिजे.यासाठी जागरूक राहणे, योजनबद्द असणे, आणि सतत प्रयास करत राहणे या तिन्ही गोष्टीना अतुलनीय महत्व आहे. त्यासाठी संगीत ऐकणे, नृत्य करणे यामुळे मन आणि शरीर हलके होऊन ताजेतवाने होते व पुढील कार्य करण्यासाठी उत्साह आणि उल्हास निर्माण होतो. त्यामुळे परिसंवादाच्या मध्यंतरात 'जे एम एफ' च्या सदस्यांचे नृत्याचे धडे घेऊन सर्वांना हलके फुलके केले.
या परिसंवाद मध्ये अनेक प्रेरणादायी चित्रफिती दाखवण्यात आल्या, प्रत्येक समस्यावर उपाय हा असतोच त्यासाठी घाबरून न जाता हसत खेळत उपाय काढायचा असतो असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगून लोखंडी आकडा एकमेकात अडकला असता कसा काढता येईल याची चित्रफित दाखवून समस्येवर उपायदेखील सहज सोप्या पद्धतीने मिळू शकतो असे उदाहरण सांगितले. कामाच्या वेळा आणि जीवन जगण्याच्या कला या दोन्ही गोष्टींना सारखेच महत्व देऊन सुवर्णमध्य साधा, व आपले जीवन सुखकर बनवा असा मौल्यवान सल्ला डॉ राजकुमार कोल्हे यांनी उपस्थितांना दिला. पाण्याचे महत्व, अन्नाचे महत्व हे कितीतरी पटीने मोठे आहे असेही सांगितले. अनेकांनी प्रश्न विचारून समाधान कारक उत्तरे घेतली.
आनंदी आणि समाधानी आयुष्य जगताना कर्तव्य आणि जबाबदारी देखील आनंदाने पार पाडा असे सांगितले. आजच्या परिसंवादामध्ये अनेकाना डॉ. राजकुमार कोल्हे यांच्याकडून प्रेरणादायी विचार मिळाले व  ताण विरहित काही तास मिळाले. जीवनाचा आनंद हा आंब्या प्रमाणे घ्या, आंबा हा कच्ची कैरी असताना आंबट असतो पण तोच पिकला की रसाळ गोड असतो.. आयुष्य देखील असेच आंबट गोड आहे असे सांगून सर्वांना आंबा फळ प्रदान केले. 'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं..
काय पुण्य असतं की जे घर बसल्या मिळतं..' 
जीवनाविषयीच्या सुन्दर अशा दोन ओळी गाऊन डॉ. राजकुमार कोल्हे यांनी परिसंवादाची  सांगता केली.

दुपारी आरे ब्रिजवर मृत्यूचा थरार! मनसेच्या चिटणीसाचा डंपरखाली येऊन दुर्दैवी अंत...

आज दुपारी मुंबईच्या आरे ब्रिजवर एक धक्कादायक अपघात घडला. महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा सेनेचे चिटणीस अशोक डांगे यांचा डंपरखाली येऊन जागीच मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेने मनसेत शोककळा पसरली आहे.


घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक भालचंद्र अंबुरे आणि मनसे विभाग अध्यक्ष संदीप ढवळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातस्थळाची पाहणी करून आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान, आरे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. अपघात कसा आणि कशामुळे घडला, याचा शोध घेतला जात आहे.

"अशोक डांगे यांच्या अचानक जाण्याने मनसेला मोठा धक्का – हा फक्त अपघात की कोणाची निष्काळजीपणा?" असा प्रश्न सध्या दक्ष नागरिकांना पडला आहे.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा सेनेचे सरचिटणीस देवेंद्र पाटील यांनी देखील शोककळा व्यक्त केली आहे.