डोंबिवली, दि.१० फेब्रुवारी – भारतीय जनता पार्टीची पॅनल क्र. २१ मधून उमेदवारी मिळवत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. रवीना राहुल म्हात्रे यांनी विकास कामांना जोरदार सुरुवात केली आहे. डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक २१ मधून त्या विजय मिळवत निवडून आलेल्या आहेत. १५ जानेवारी ला मतदान १६ जानेवारी निकाल लागला आणि लगेच कामाला सुरुवात करत, जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी खरी उतरेन, असे म्हणत त्यांनी निवडणुकीनंतर कोणत्याही पर्यटन स्थळी फिरायला जाण्याऐवजी जनतेची काम करण्यास पसंती देत कामाला सुरुवात केली.
पहिलं काम त्यांनी जनतेच्या सुविधेसाठी एक ऍम्बुलन्स स्वखर्चातून चालू केली आहे. शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयामध्ये हृदयविकारावर कोणताही उपचार नसल्यामुळे अशा रुग्णांना शिवाजी हॉस्पिटल कळवा किंवा परळ ला केईएम सारख्या ठिकाणी उपचारासाठी न्यावं लागतं. इतका लांबचा पल्ला गाठायचा असेल तर त्या पेशंटच्या जीवाला दगा फटका न होता तो सुरक्षित रुग्णालयापर्यंत पोहोचावा यासाठी, कार्डियाक ॲम्बुलन्स ही खूप गरजेची असते म्हणून त्यांनी स्वतःच्या प्रभागासाठी सुरू केली आहे.
रुग्णांना उपचार हे आपल्या इथे डोंबिवली मधील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये सर्व नगरसेवकांच्या मदतीने सर्वच सर्जरी केल्या जातील याचा प्रयत्न आम्ही करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच "सुभाष रोड" चे डोंबिवली स्टेशन पासून नवापाडा चौक पर्यंत काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. गटार असेल त्यावरील चेंबर, रोडच्या बाजूला असलेले पादचारी रस्त्यांची कामे झपाट्याने सुरू केले आहेत.
पाण्याच्या प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे त्यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या निधीतून गणेश घाट येथील, २.५० लक्ष मिली लिटर जलकुंभाचे काम ८०% पूर्ण झाले, पुढील चार ते पाच महिन्यात उर्वरित काम पूर्ण होऊन लवकरच या जलकुंभामुळे डोंबिवली पश्चिमेतील जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटेल. मात्र तोपर्यंत डॉ. रवीना राहुल म्हात्रे यांच्या स्वखर्चातून ज्या ठिकाणी जुन्या विहिरी आहेत त्या विहिरी स्वच्छ करून त्या विहिरीतील पाणी नागरिकांना वापरासाठी पुरवण्यात येत आहे.