BREAKING NEWS
latest

लोकनायक महेश पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  डोंबिवली अंबिका नगर येथील   मा. नगरसेवक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण तालुका प्रमुख तसेच जिल्हा समन्वयक महेश पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांने आज शनिवारी साजरा करण्यात आला. या विधायक कार्याचे डोंबिवलीतील नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची धुरा अंगावर घेतलेल्या महेश पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि कल्याण-डोंबिवली चे लोकप्रिय खासदर डॉ. श्रीकांत एकनाथ  शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक सामाजिक कार्याला व्यापक स्वरुप देण्यास सुरुवात केली आहे. याचा श्रीगणेशा वाढदिवसाच्या निमित्ताने डोंबिवलीत जागोजागी पहायला मिळाला. सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत सामाजिक बांधिलकी जपत विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले होते. यावेळी महेश पाटील यांचे संपूर्ण कुटुंब, पत्नी, दोन मुले, बहिण माजी नगरसेविका डॉ.सुनिता पाटील, विजय बाकाडे, सुजित नलावडे, संजय विचारे, दत्ता वाटोरे, मूसा शेख, सिकंदर मखानी, महेश पाटील प्रतिष्ठान चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. "
   कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील रुग्णांना महेश पाटील यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले. डोंबिवली पूर्व येथील कैलास लस्सी येथे अन्नदान करण्यात आले याचा लाभ शेकडो गरजुनी घेतला. खिडकाळी मंदीर येथे सकाळी धान्य वाटप, नंदादीप शाळा, टीटवाळ्यातील अंकुर बालविकास केंद्र तथा आश्रमाला लागणाऱ्या वस्तू वाटप तसेच  अंगणवाडी शाळा आणि आचार्य भिसे शाळेत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच सांगावं येथे रक्तदान शिबीराचे आणि हळदीकुंकू चे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी एमआयडीसीतील जेष्ठ नागरिक कट्टा येथे जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत