रोहन दसवडकर
विलेपार्ले पूर्व येथील साठये महाविद्यालयातील जनसंवाद विभागाचा येत्या 15, 16, 17 डिसेंबर रोजी माध्यम महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी काल दिनांक ५ डिसेंबर 2023 रोजी या माध्यम महोत्सवाचा उद्घाटन समारंभ पार पडला.
उद्घाटन समारंभाला साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे सर त्याचबरोबर उपप्राचार्य डॉ . दत्तात्रय नेरकर , उपप्राचार्या श्रीमती प्रमोदिनी सावंत , माध्यम विभाग प्रमुख गजेंद्र देवडा , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. केतन भोसले , डॉ . सूरज पंडित , प्रा . रसिका सावंत , प्रा . नारायण परब आदी प्राध्यापक उपस्थित होते .
या उद्घाटनाची सुरुवात फ्लॅश मॉबने झाली. भारतीय संस्कृती - जतन समृध्दीचे , वारसा परंपरेचा ही या वर्षीची माध्यम महोत्सवाची संकल्पना असल्यामुळे फ्लॅश मॉब देखील तसाच पाहायला मिळाला.
विविध राज्यांची लोकनृत्ये मुलांनी एका वेगळ्याच जल्लोषात सादर केली. याचे दिग्दर्शन परफॉर्मन्स टीम हेड रोहन दसवडकर व सायली आंगवलकर यांनी केले.
त्यानंतर प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांच्या उपस्थितीत ढोल ताशाच्या गजरात माध्यम महोत्सवच्या बॅनरचे अनावरण करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला साठ्ये महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीने आणि उत्साहाने हा उद्घाटन समारंभ धुमधडाक्यात पार पडला.