BREAKING NEWS
latest
kokan sanstha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
kokan sanstha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कोकण संस्थेची यशाच्या १२ वर्षांची पूर्तता


      कोकण संस्थेची यशाच्या १२ वर्षांची पूर्तता

न्याय रणभूमी प्रतिनिधी - रोहन दसवडकर

कोकण संस्था गेली १२ वर्षे शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, अनाथ मुलांसाठी वसतिगृह आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विविध क्षेत्रांच्या विकासासाठी काम करत आहे. कोकण कला व शिक्षण विकास ही एक संस्था आहे जी शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांद्वारे समाजाला चांगले जीवन जगण्यास मदत करण्यासाठी प्रयत्न करते.  ही संस्था वंचित मुलांना मदत करते आणि शिक्षण, गावाचा विकास, अनाथाश्रमांना मदत, आपत्ती निवारण मदत आणि गंभीर आजार असलेल्या मुलांसाठी वैद्यकीय मदत यांना प्रोत्साहन देते.  
    २९ ऑक्टोबर २०२३ रोजी या संस्थेची यशाची आणि इतरांच्या मदतीची यशस्वी १२ वर्षे पुर्ण झाली. भव्य दिव्य अशी सजावट या निमित्ताने करण्यात आली. या कार्यक्रमात ग्रामीण भागातील भागधारकांनी मंगळागौर या सांस्कृतिक नृत्य सादर करून लोकांकडून वाहवा मिळवली आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
     संस्थेच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्ताने हिंदी व मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केलेला व  'बाईपण भारी देवा' या सुपरहिट चित्रपटात प्रमुख भूमिका साकारून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री  सौ. दीपा परब - चौधरी यांनी देखील स्वतःची उपस्थिती दर्शवली. त्यांना कार्यक्रमात राज्यस्तरीय कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  
 दीपा परब यांनी सन्मान स्वीकारल्यावर माल्वणींतून आपल्या संबोधनाला सुरुवात केली व म्हणाल्या की माझे वडील असते तर त्यांना आज खूप आनंद झाला असता. कारण एका सामाजिक संस्थेने माझा आज गौरव केला आहे. आम्ही कलाकार आहोत आम्हाला कामाचे मानधन मिळते पण गरजूंसाठी अविरत मोफत काम करणाऱ्या कोकण संस्थेचे मला खूप कौतुक वाटते, हे काम कठीण तर आहेच पण कोकण संस्था समाजासाठी करत असलेले काम खरोखर खूप प्रशंसनीय व प्रेरणादायी आहे.
   याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ.अमेय देसाई यांनाही राज्यस्तरीय कोकण रत्न यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
दादर येथे आज पार पडलेल्या या कार्यक्रमात डिजिटल सोशल चेंज मेकर म्हणजेच टॉप १२ रीलस्टारना रील टू रिअल या पुरस्काराने सौ. दीपा परब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यात सई उतेकर, तन्मय पाटेकर, बिनधास्त गर्ल गौरी पवार, रोशन पुजारी, किरण पास्ते, सायली इंदुलकर, साहिल दळवी, प्रथमेश कदम, अमित कुबडे, निखिल सकपाळ, अनमोल यादव, अंकिता प्रभू वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ अमेय देसाई यांच्या हस्ते शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांचा झिरो टू हिरो या पुरस्काराने सन्मान करण्यात आला यामध्ये पुणे मावळ विभागातील ग्रामसेविका सौ. प्रतिभा विठ्ठल कुंभार,तर ठाणे ग्रामीण आणि आदिवासी विभाग शहापूरच्या सौ तारा सांगळे आणि श्रीमती पूजा कंठे, तर पालघर वाडाच्या सौ. रोशना निलेश पाटील आणि मानसी मनोज पानवे भिवंडी यांचा समावेश होता.
काशिनाथ धुरू हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ. गीताली पवार, श्रीमती अमृता माने, संदीप सिंग, विशाल महांगरे, संस्था व्यवस्थापक साक्षी पोटे, प्रीती पांगे, सुरज कदम सह शेकडो सांस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऍक्टर अक्षय ओवळे तर आभार संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी मांडले.